शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांच्या निधनाने राजकारणात प्रवेश अन् ३ टर्म खासदार; मोदींच्या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 20:51 IST

Kinjarapu Ram Mohan Naidu : नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले नाव खासदार राम मोहन नायडू किंजरापू यांचे आहे.

PM Narendra Modi Oath Ceremony :नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी पंतप्रधान मोदी यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात चंद्रमोहन नायडू यांच्या टीडीपी पक्षातून दोन खासदारांना मंत्री करण्यात आले आहेत. चंद्रशेखर पेम्मासानी आणि राम मोहन नायडू किंजरापू यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. यातील टीडीपी खासदार राम मोहन हे सर्वात लोकप्रिय नावांपैकी एक आहे. खासदार राम मोहन हे केवळ ३६ वर्षांचे असून मोदी ३.० मंत्रिमंडळामधील सर्वात तरुण मंत्री आहेत.

टीडीपीचे खासदार किंजरापू राम मोहन नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. एनडीएमध्ये भाजपनंतर टीडीपी हा  सर्वात मोठा पक्ष आहे, ज्याला १६ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे टीडीपीला दोन मंत्रि‍पदे देण्यात आली आहेत. त्यातच आता राम मोहन नायडूंना महत्त्वाचे मंत्रिमंडळ मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री बनलेले राम मोहन नायडू हे चंद्राबाबू नायडू यांच्या जवळचे मानले जातात. वयाच्या २६ व्या वर्षी पहिल्यांदाच विजयी होऊन ते खासदार झाले.

२३ कोटींची संपत्ती

लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, राममोहन नायडू यांची एकूण संपत्ती २३.३० कोटी रुपये आहे. तर त्यांच्यावर २ कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे. राममोहन नायडू यांनीही शेअर बाजारात मोठी गुंतवणूक केली आहे. शेअर्समधील गुंतवणुकीत राममोहन नायडू यांनी १.१० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. राममोहन नायडू यांच्याकडे १.४५ लाख रुपयांची रोकड आहे. तर त्यांच्या पत्नीकडे सुमारे २ लाख रुपयांची रोकड आहे. याशिवाय त्यांच्या बँक खात्यांमध्ये ३ कोटींहून अधिक रक्कम जमा आहे. यासोबतच त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर सुमारे ४८ लाख रुपयांच्या एलआयसी पॉलिसी आहेत. राममोहन नायडू आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे  अंदाजे १.५१ कोटी रुपयांचे दागिने आहे.

वडिलांच्या निधनानंतर राजकारणात प्रवेश

राम मोहन नायडू यांनी त्यांच्या वडिलांचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्यानंतर राजकारणात प्रवेश केला होता. वडिलांचे अकाली निधन झाले नसते तर कदाचित राम मोहन नायडू राजकारणात दिसले नसते. दिल्लीत शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेले होते. येथे त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर एमबीए केले. यानंतर राम मोहन नायडू हे सिंगापूरला गेले, जिथे ते वडिलांच्या निधनाच्या बातमीने त्यांना धक्का बसला. नायडू हे २४ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर नायडू हे सर्व काही सोडून ते मायदेशी परतले आणि त्यांनी वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :narendra modi oath ceremonyनरेंद्र मोदी शपथविधीNarendra Modiनरेंद्र मोदीChandrababu Naiduचंद्राबाबू नायडू