शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
2
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
3
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
4
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
5
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
6
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
7
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
8
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
9
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
10
IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणले; पण 'स्टारडम कल्चर'मुळं विराटचे लाड?
11
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
12
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
13
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
14
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
15
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
16
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
17
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
18
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
19
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ
20
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य

दिल्लीत २७ वर्षांनी भाजपला स्पष्ट बहुमत; पंतप्रधान मोदींनी दिल्लीकरांना दिली मोठी गॅरंटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 17:33 IST

दिल्लीतल्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांचे आणि दिल्लीकरांचे आभार मानले आहेत.

Delhi Assembly Elections: दिल्लीत २७ वर्षांनंतर भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, भाजपने ४१ जागा जिंकल्या एकूण ४८ जागांवर आघाडी घेतली आहे. तर सत्ताधारी आम आदमी पार्टीने देखील २० जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही. २०१५ पासून दिल्लीत सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाचा पराभव केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आनंदित झाले आहेत. या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा विकास आणि सुशासनाचा विजय असल्याचे म्हटले. यासोबत भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी दिल्लीकरांना गॅरंटी देखील दिली आहे.

भाजपने २७ वर्षांनंतर दिल्लीत पुनरागमन केलं आहे. दुसरीकडे आम आदमी पक्षाला मोठ्या पराभवाला सामोरे जावं लागले आहे. दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाला असून पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल  मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, सौरभ भारद्वाज आणि इतर अनेक बडे नेतेही पराभूत झाले आहेत. आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी पराभव स्वीकारला असून आपण लोकांसाठी काम करत राहू असे म्हटले आहे. दुसकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत दिल्लीकरांना महत्त्वाची गॅरंटी दिली आहे

"आम्ही दिल्लीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि इथल्या लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही ही आमची गॅरंटी आहे.  यासोबतच विकसित भारताच्या उभारणीत दिल्लीची महत्त्वाची भूमिका आहे, हे आम्ही सुनिश्चित करू. मला आमच्या सर्व भाजप कार्यकर्त्यांचा अभिमान आहे, ज्यांनी या जनादेशासाठी रात्रंदिवस काम केले. आता आम्ही आमच्या दिल्लीकरांच्या सेवेसाठी आणखी मजबुतीने काम करत राहू," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

आम्ही राजकारणात सेवा करण्यासाठीच आलो आहोत - अरविंद केजरीवाल

"दिल्लीच्या जनतेने भाजपाला ज्या गोष्टींसाठी मतं दिली आहेत ती भविष्यात नीट पार पाडली जातील. गेल्या १० वर्षात आमच्या पक्षाने प्रत्येक क्षेत्रात कार्यरत राहून दिल्लीचा विकास केला. दिल्लीकरांना सर्व सोयीसुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहिला. दिल्लीतील पायाभूत सुविधा सुधारण्यावरही आम्ही काम केले. आता आम्ही विरोधी पक्षाची भूमिकाही चोखपणे पार पाडू. दिल्लीकरांच्या सुख-दु:खात आम्ही त्यांच्या सोबत असू. आम्ही राजकारणात सेवा करण्यासाठीच आलो आहोत. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी घेतलेल्या कष्टासाठी त्यांचे आभार," अशी प्रतिक्रिया अरविंद केजरीवाल यांनी दिली. 

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025delhi electionदिल्ली निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा