शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Guru Gobind Singh Jayanti: PM मोदींची मोठी घोषणा, आता दर 26 डिसेंबरला साजरा केला जाणार 'वीर बाल दिवस'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 13:53 IST

पंतप्रधान मोदींनी यापार्श्वभूमीवर रविवारी ट्विट करत म्हणटले आहे की, गुरु गोविंद सिंग यांची जयंती, प्रकाश पर्वा निमित्त, मला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की, आता भारत दर वर्षी २६ डिसेंबरला 'वीर बाल दिवस' साजरा करेल. गोविंद सिंगांच्या चार साहिबजाद्यांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी गुरु गोविंद सिंगजी यांची जयंती अर्थात 'गुरु पर्वा'निमित्त मोठी घोषणा केली आहे. आता दरवर्षी 26 डिसेंबरला 'वीर बाल दिवस' (Veer Bal Diwas) (वीर बालदिन) साजरा केला जाणार आहे. पंतप्रधानांच्या या निर्णयाकडे गुरु गोविंद सिंगजी यांच्या चार पुत्रांना (चार साहबजादे) श्रद्धांजली म्हणून पाहिले जात आहे.

पंतप्रधान मोदींनी यापार्श्वभूमीवर रविवारी ट्विट करत म्हणटले आहे की, गुरु गोविंद सिंग यांची जयंती, प्रकाश पर्वा निमित्त, मला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की, आता भारत दर वर्षी २६ डिसेंबरला 'वीर बाल दिवस' साजरा करेल. गोविंद सिंगांच्या चार साहिबजाद्यांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल.

पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे लिहिले, 'वीर बाल दिवस, हा तोच दिवस आहे, ज्या दिवशी साहिबजादे जोरावर सिंग आणि साहिबजादे फतेह सिंग यांनी या देशासाठी बलिदान दिले आणि त्यांना भिंतीत जिवंत चिनून मारण्यात आले होते. या दोन महान व्यक्तींनी इतर कोणताही धर्म स्वीकारण्याऐवजी मृत्यू स्वीकारला होता.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, माता गुजरी देवी, श्री गुरु गोविंद सिंग आणि त्यांच्या चार साहिबजाद्यांचे शौर्य भारतातील कोट्यवधी लोकांना धैर्य देते. ही थोर माणसे अन्यायापुढे कधी झुकली नाहीत. आता लोकांनी त्यांच्याबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करण्याची वेळ आली आहे.

पंतप्रधान मोदीची गुरु गोविंद सिंगांना श्रद्धांजली -पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी प्रकाश पर्वानिमित्त 10वे शीख गुरु गोविंद सिंगजी यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि म्हणाले, की त्यांचे जीवन आणि संदेश लाखो लोकांना शक्ती देते. एवढेच नाही, तर गुरु गोविंद सिंग यांची ३५०वी जयंती साजरी करण्याची संधी आपल्या सरकारला मिळाली याचा मला नेहमीच आनंद वाटत राहील, असेही मोदी यावेळी म्हणाले.  

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीsikhशीखBJPभाजपा