शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

"घराणेशाही पक्ष फक्त कुटुंबाच्या कल्याणात गुंतले आहेत, पण भाजप...", नरेंद्र मोदींचा विरोधकांवर जोरदार निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2023 18:07 IST

रविवारी तेलंगणातील महबूबनगर येथे जाहीर सभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी राज्यातील के चंद्रशेखर राव (KCR) सरकारवर जोरदार निशाणा साधला. 

हैदराबाद : घराणेशाही पक्ष केवळ आपल्या कुटुंबाच्या कल्याणात गुंतले आहेत, परंतु भाजपला देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या कुटुंबाची काळजी आहे. आमचे संपूर्ण लक्ष लोकांना चांगले जीवन आणि संधी देण्यावर आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. रविवारी तेलंगणातील महबूबनगर येथे जाहीर सभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी राज्यातील के चंद्रशेखर राव (KCR) सरकारवर जोरदार निशाणा साधला. 

जाहीर सभेला संबोधित करताना नरेंद्र मोदींनी सर्वप्रथम देशवासियांना 'स्वच्छता कार्यक्रमात' सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच, ते म्हणाले की, येथे येण्यापूर्वी आज सकाळी स्वच्छता अभियानाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. मी देशवासियांना आवाहन करतो की, स्वच्छता कार्यक्रमात सहभागी व्हा आणि या मोहिमेत सहभागी होण्यासाठी एक तास काढा.

याचबरोबर, अलिकडच्या वर्षांत तेलंगणातील जनतेने लोकसभा, विधानसभा आणि नागरी निवडणुकांमध्ये भाजपला बळ दिले आहे. आज येथे दिसणाऱ्या गर्दीतून मला विश्वास आहे की तेलंगणातील जनतेने परिवर्तनाचा संकल्प पक्का केला आहे. तेलंगणाला बदल हवा आहे, कारण राज्याला भ्रष्टाचाराची नव्हे तर पारदर्शक आणि प्रामाणिक सरकारची गरज आहे. तसेच, तेलंगणाला जमिनीवर काम करण्याची आणि भाजप सरकारची गरज आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

"शेतकऱ्यांना दिलं होतं खोटे आश्वासन"पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, तेलंगणातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, राज्य सरकारने त्यांच्या समस्यांकडे कधीच लक्ष दिले नाही. खोट्या आश्वासनांमुळे अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. आमचे येथे सरकार नाही, तरीही आम्ही शेतकर्‍यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. वर्षानुवर्षे बंद असलेला रामागुंडम खत प्रकल्प आम्ही पुन्हा सुरू केला. जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल. तसेच, 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी' योजनेअंतर्गत तेलंगणातील शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 10,000 कोटी रुपये थेट जमा करण्यात आले, असेही नरेंद्र मोदींनी सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीTelanganaतेलंगणा