शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

...अन् पंतप्रधान मोदींच्या भावानं पोलीस ठाण्याबाहेरच धरणं धरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 14:48 IST

प्रल्हाद दामोदरदास मोदींचं पोलीस ठाण्याबाहेर धरणं

जयपूर: पोलिसांनी पुरेशी सुरक्षा न दिल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद दामोदरदास मोदी यांनी पोलीस ठाण्याबाहेरचं धरणं धरलं. काल (मंगळवारी) रात्री ही घटना घडली. प्रल्हाद मोदी उदयपूरहून जयपूरला दाखल झाले. पोलिसांनी आपल्याला एस्कॉर्ट वाहन न दिल्याचं मोदी म्हणाले. पोलीस सुरक्षेसाठी स्वतंत्र वाहन देत नसल्यानं त्यांनी बागरु पोलीस ठाण्याबाहेर धरणं धरलं. 'मी कुठेही जातो, तेव्हा मला राज्य सरकारकडून एस्कॉर्ट वाहन दिलं जातं. पण जयपूरच्या पोलीस आयुक्तांना माझ्यापासून किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून काहीतरी अडचण असावी. त्यामुळेच त्यांनी मला स्वतंत्र एस्कॉर्ट वाहन देण्यास नकार दिला,' असं प्रल्हाद मोदी म्हणाले. पोलीस आयुक्तांनी माझ्या सुरक्षेसाठी केवळ दोन पोलीस दिले आणि त्यांना माझ्यासोबत माझ्याच गाडीतून प्रवास करण्यास सांगितलं, असा दावादेखील त्यांनी केला. माझ्यासोबत माझं कुटुंब प्रवास करत असल्यानं गाडीत जागाच नाही, असं मोदींनी माध्यमांना सांगितलं. माझ्यासोबत दोन पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर्स (पीएसओ) देण्यात यावे, इतकीच मागणी आयुक्तांकडे केली होती, असं प्रल्हाद मोदींनी म्हटलं. यावर जयपूरचे पोलीस आयुक्त आनंद श्रीवास्तव यांनी स्पष्टीकरण दिलं. 'दोन पीएसओ बागरु पोलीस ठाण्यात मोदींची वाट पाहत होते. नियमानुसार त्यांनी मोदींच्या गाडीतूनच प्रवास करायला हवा. आम्ही याबद्दलचे आदेशदेखील मोदींना दाखवले. ज्या व्यक्तीला सुरक्षा पुरवली जाते, त्याच व्यक्तीच्या वाहनातून पीएसओंनी प्रवास करायचा असतो. मात्र प्रल्हाद मोदींनी पीएसओंना त्यांच्या गाडीत घेण्यास नकार दिला. पीएसओंना स्वतंत्र वाहन देण्यात यावं अशी त्यांची मागणी होती,' असं श्रीवास्तव यांनी सांगितलं.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPoliceपोलिस