शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींचा १० वर्षांचा कार्यकाळ ईशान्य भारतासाठी ‘सुवर्णकाळ’, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 08:21 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, ईशान्येकडील राज्ये हा भारताचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे, असे मोदी सरकारचे मत आहे.

शिलाँग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा १० वर्षांचा कार्यकाळ हा ईशान्य भारतातील राज्यांसाठी सुवर्णकाळ आहे. या कालावधीत या राज्यांमध्ये पायाभूत सुविधांची उभारणी व संघर्ष मिटविण्यासाठी योग्य तोडगा काढण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले.

नॉर्थ इस्टर्न कौन्सिलच्या (एनइसी) ७१व्या अधिवेशनात ते म्हणाले की, वारंवार होणारे रास्ता रोको, बंद, धुमसत असणारा असंतोष हे राज्यांतील चित्र आता इतिहासजमा झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात पायाभूत सुविधांचा विकास झाल्यामुळे केवळ ईशान्य भारत व दिल्ली तसेच देशातील अन्य भागांतले अंतर केवळ कमी झाले नाही तर लोकांमधील मतभेदही कमी झाले. 

ईशान्य भारतात हिंसाचाराच्या घटना घटल्याकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, ईशान्येकडील राज्ये हा भारताचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे, असे मोदी सरकारचे मत आहे. २००४ ते २०१४ या कालावधीत ११,१२१ हिंसक घटना ईशान्य भारतात घडल्या. २०१४ ते २०२३मध्ये या घटनांची संख्या ३,११४ होती. म्हणजे हिंसक घटनांत ७३ टक्क्यांनी घट झाली. या राज्यांत विविध घटनांत लष्करी जवान शहीद होण्याचे प्रमाणही ७१ टक्क्यांनी तर हिंसाचारात नागरिकांचा मृत्यू होण्याचे प्रमाण ८६ टक्क्यांनी घटले.

घुसखोरीचे प्रमाणही झाले कमीअमित शाह म्हणाले की, ईशान्य भारतातील राज्यांमध्ये घुसखोरी होण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. गेल्या पाच वर्षांत दहशतवादी संघटनांचे ८,९०० सदस्य शरण आले असून मुख्य प्रवाहात सामील झाले. शांतता व समृद्धी एकत्र नांदते हा संदेश त्यातून सर्व देशाला मिळाला आहे. 

टॅग्स :Amit Shahअमित शाह