शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 16:13 IST

PM Modi Visit Adampur Airbase: आदमपूर एअरबेसवरील S-400 हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केल्याचा पाकिस्तानचा दावा अखेर खोटा ठरला.

PM Modi Visit Adampur Airbase: भारतीय सैन्याच्या "ऑपरेशन सिंदूर'च्या भव्य यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज(13 मे 2025) सकाळी अचानक पंजाबमधील आदमपूर एअरबेसवर पोहोचले आणि त्यांनी भारतीय हवाई दलातील अधिकारी आणि सैनिकांची भेट घेतली. पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीदरम्यान सैनिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. यावेळी पीएम मोदींनी सैनिकांसोबत मनसोक्त गप्पा मारल्या.

पंतप्रधान मोदींकडून पाकिस्तानच्या 'त्या' दाव्याची पोलखोलपंतप्रधान मोदी अशा वेळी आदमपूर एअरबेसवर पोहोचले, जेव्हा पाकिस्तान जगभरात सतत खोटी माहिती पसरवत आहे. पाकिस्तान सातत्याने आदमपूर एअरबेसवर हल्ला करून त्याचे मोठे नुकसान केल्याचा दावा करत होता. पण, पंतप्रधान मोदी स्वतः आदमपूर एअरबेसवर पोहोचल्यामुळे पाकिस्तानचा खोटेपणा जगासमोर उघड झाला.

एस-400 हवाई संरक्षण प्रणाली सुरक्षितऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांवर ड्रोन हल्ले केले, त्याला भारतीय सैन्याने परतून लावले. पण, यानंतर पाकिस्तान सरकारने सतत याबाबत खोटा प्रचार करत होता. आदमपूर एअरबेस उडवल्याचे पाकिस्तान सरकार आणि माध्यमांमधून सांगितले जाऊ लागले. पाकिस्तानने आदमपूरमधील एस-400 हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केल्याचा दावाही केला होता. पण, आता आज पंतप्रधान मोदींनी या एअरबेसवर जाऊन S-400 हवाई संरक्षण प्रणालीसोबत फोटो शेअर केला. 

पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर या दौऱ्याचे अनेक फोटो शेअर केले आहेत. यामध्ये आदमपूर एअरबेस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे आणि पाकिस्तानचा दावा पूर्णपणे खोटा आणि निराधार असल्याचे सिद्ध झाले आहे. दरम्यान, या फोटोपैकी एका फोटोमध्ये पंतप्रधान मोदींच्या पाठीमागे S-400 हवाई संरक्षण प्रणालीदेखील दिसत आहे. यावरुनच हा एअरबेस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सिद्द होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तान