शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

औरंगाबादच्या मराठमोळ्या शिल्पकाराने साकारली दिल्लीतील भव्य राजमुद्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 05:57 IST

दिल्लीत उभ्या राहणाऱ्या सेंट्रल व्हिस्टामध्ये २६ फूट उंचीच्या भव्य अशाेकस्तंभ राजमुद्रेचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी पार पडले.

शांतीलाल गायकवाड दिल्लीत उभ्या राहणाऱ्या सेंट्रल व्हिस्टामध्ये २६ फूट उंचीच्या भव्य अशाेकस्तंभ राजमुद्रेचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी पार पडले. ही राजमुद्रा औरंगाबादचे सुपुत्र शिल्पकार सुनील देवरे व सुशील देवरे बंधूंनी साकारली असून, ती जयपूरमार्गे दिल्लीत स्थापित करण्यात आली. 

मुंबईच्या जेजे स्कूल ऑफ आर्ट्सचे पदवीधर सुनील देवरे यांनी अनेक शिल्पे साकारली आहेत. एमजीएमच्या यशवंत ग्राफिक्समधील डिझायनर सुशील देवरे यांनी या राजमुद्रेच्या निर्मितीची कहाणी लोकमत प्रतिनिधीसमोर कथन केली.

अशी आहे याची कहाणी...

  • वर्षभरापूर्वी ऑगस्टमध्ये क्ले मॉडेल तयार करण्याचे  काम सुरू झाले व आठ महिन्यांत ते पूर्णही झाले. या राजमुद्रेचे शिल्प तयार करण्याचे काम टाटा ग्रुपमार्फत आमच्या सुनील देवरे स्टुडियोला मिळाले. यासाठी देशभरातून मॅकेट्स (छोटे मॉडेल्स) मागविण्यात आले होते. त्यातील आमचे मॅकेट्स निवडले गेले. 
  • संसदेच्या पथकाने सावंगीतील स्टुडियोला भेट देऊन क्ले मॉडेलची पाहणी केली. अपेक्षित बदल सुचवून या मॉडेलला मंजुरी मिळाली. त्यानंतर हे भव्य शिल्प तयार करून त्याचे फायबर शिल्प तयार करण्यात आले. एवढ्या भव्य शिल्पापासून एकसंघ धातूचे शिल्प  तयार  करण्यासाठी औरंगाबादेत मोठ्या भट्ट्या नाहीत. त्यामुळे फायबर शिल्पाचे लहान भाग करून ते जयपूरच्या शिल्पिक स्टुडिओत नेण्यात आले. तेथे ब्राँझ धातूचे एकसंघ शिल्प साकारले. 

या शिल्पाची वैशिष्ट्येउंची : २६ फूट  व्यास : ११ फूटवजन : ९ टन   धातू : ब्राँझ स्ट्रक्चरल डिझाइन : धनश्री काळे, वास्तुविशारद, औरंगाबाद

औरंगाबादेत व औरंगाबादच्या सुपुत्राने तयार केलेली राजमुद्रेची भव्य प्रतिकृती दिल्लीतील संसद भवनासमोर दिमाखाने उभी राहिली आहे. हा क्षण औरंगाबादसाठी गौरवाचा व अभिमानाचा  आहे.         सुशील देवरे, ग्राफिक डिझायनर

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसदAurangabadऔरंगाबाद