शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

...जेव्हा मोदींनी पकडली केजरीवालांची चलाखी; हात जोडून मागावी लागली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 14:58 IST

कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी बोलावली बैठक; मोदींनी काढली केजरीवालांची खरडपट्टी

नवी दिल्ली: देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीला कोरोनाचा सर्वाधिक फटका असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. या बैठकीत मोदींनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त केली. अशा खासगी संवादाचा प्रचार-प्रसार केला जात नाही. तुम्ही एक अतिशय महत्त्वाचा प्रोटोकॉल मोडला आहे, अशा शब्दांत मोदींनी केजरीवालांना सुनावलं. यानंतर केजरीवाल बांभावून गेले. त्यांनी हात जोडून पंतप्रधान मोदींची माफी मागितली.दिल्लीतील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता आहे. मला दररोज यासाठी फोन येतात. मी काय करावं? मी कोणाला फोन करावा?, असे प्रश्न केजरीवालांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुरू असलेल्या बैठकीत उपस्थित केले. विशेष म्हणजे केजरीवालांकडून या बैठकीचं थेट प्रक्षेपण सुरू होतं. याबद्दल मोदींनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. 'तुमची कृती आपल्या परंपरेच्या, प्रोटोकॉलच्या विरुद्ध आहे. एखाद्या मुख्यमंत्र्यांनी अशा बैठकीचं थेट प्रक्षेपण करणं प्रोटोकॉलला धरून नाही,' असं मोदींनी केजरीवालांना सुनावलं.तुम्ही करत असलेली कृती योग्य नाही. अशा स्वरुपाच्या बैठकीचं थेट प्रक्षेपण करणं योग्य नाही. आपल्याला कायम संयम ठेवायला हवा, असं मोदींनी म्हटलं. यानंतर केजरीवाल यांनी आपली चूक झाल्याचं म्हटलं. 'पुढील वेळेपासून मी याची काळजी घेईन. माझ्याकडून चूक झाली असेल, मी काही कठोरपणे बोललो असेन, तर मी त्यासाठी माफी मागतो,' असं म्हणत केजरीवालांनी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये हात जोडले....जेव्हा मोदींनी लक्षात आली केजरीवालांची चलाखीअरविंद केजरीवाल व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमधील त्यांचा संवाद गुपचूपपणे रेकॉर्ड करत होते. ही बाब पंतप्रधान मोदींच्या लक्षात आली. त्यांनी याबद्दल केजरीवालांना कठोर शब्दांत सुनावलं. त्यावेळी केजरीवालांना काहीसा धक्काच बसला. केजरीवालांनी पंतप्रधानांसोबतचा संवाद केवळ रेकॉर्ड केला नाही. तर तो लीकदेखील केला. यावरून आता भारतीय जनता पक्षानं केजरीवालांना लक्ष्य केलं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल