शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी सांगितलं इंटरनेटवर व्हायरल झालेल्या 'त्या' फोटोंमागचं सत्य 

By मोरेश्वर येरम | Updated: November 29, 2020 13:08 IST

"गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर चेरी ब्लॉसमचे फोटो व्हायरल झाले आहेत. चेरी ब्लॉसम म्हटलं की तुम्ही विचार करत असाल मी जपानबद्दल बोलतोय. पण तसं नाहीय. इंटरनेटवर व्हायरल झालेले ते फोटो जपानचे नाहीत.'', असा खुलासा मोदींनी केला. 

ठळक मुद्देइंटरनेटवर व्हायरल झालेले ते फोटो नेमके कुठले? मोदींनी सांगितलं सत्यचेरी ब्लॉसमच्या फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलंयकोरोनामुळे यंदा होऊ शकला नाही चेरी ब्लॉसम फेस्टीव्हल

नवी दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवर 'मन की बात' या कार्यक्रमातून देशातील नागरिकांशी संवाद साधला. मोदींनी यावेळी विविध विषयांवर भाष्य केलं. सध्या इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या 'चेरी ब्लॉसम' फोटोंचीही दखल मोदींनी घेतली. गुलाबी रंगाच्या मनमोहक फुलांची जणू चादर शहराने ओढली असावी असे हे सुंदर फोटो नक्की कुठले आहेत? अशी चर्चा सोशल मीडियात सुरू होती. काहींनी जपानमधील ते फोटो असल्याचं म्हटलं. पण या फोटोंमागचं सत्य मोदींनी आज देशवासियांना सांगितलं. 

इंटरनेटवर व्हायरल होत असलेले ते फोटो जपानचे नाहीत"गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर चेरी ब्लॉसमचे फोटो व्हायरल झाले आहेत. चेरी ब्लॉसम म्हटलं की तुम्ही विचार करत असाल मी जपानबद्दल बोलतोय. पण तसं नाहीय. इंटरनेटवर व्हायरल झालेले ते फोटो जपानचे नाहीत.'', असा खुलासा मोदींनी केला. 

मेघालयचं सौंदर्य वाढवणारे चेरी ब्लॉसमचे फोटोमोदी पुढे म्हणाले की, ''इंटरनेटवर चर्चा होत असलेले ते फोटो मेघालयच्या शिलॉंग येथील आहेत. मेघालयच्या सौंदर्यात चेरी ब्लॉसमने भर टाकली आहे''

मेघालयमध्ये दरवर्षी होतो चेरी ब्लॉसम फेस्टीव्हलगुलाबी फुलांची चादर ओढलेले हे चेरी ब्लॉसमचे वृक्ष थंडीचं स्वागत करण्यासाठी सज्ज असतात. मनमोहक गुलाबी रंगाच्या फुलांचे सौंदर्य डोळ्यांना सुखावणारे असते. मेघालयच्या शिलॉंग येथे दरवर्षी चेरी ब्लॉसम फेस्टीव्हलचे आयोजन केले जाते. थंडीच्या दिवसात शिलॉंगमध्ये चेरी ब्लॉसमच्या झाडांना बहर येतो आणि सर्वत्र गुलाबी रंगाची उधळण झालेली पाहायला मिळते. 

कोरोनामुळे होऊ शकला नाही चेरी ब्लॉसम फेस्टीव्हलकोरोनाच्या महामारीमुळे यंदा चेरी ब्लॉसम फेस्टीव्हलचं आयोजन होऊ शकलं नाही. दरवर्षी या फेस्टीव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक शिलॉंगमध्ये येत असतात. पण यावेळी कोरोनामुळे सर्वच गोष्टींवर निर्बंध आले. फेस्टीव्हल होऊ शकला नसला तरी या ठिकाणच्या सुंदर फोटोंनी सध्या सोशल मीडिया व्यापून टाकलं आहे. सर्वत्र या फोटोंची चर्चा होत आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीshillong-pcशिलांगBJPभाजपा