शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

"संदेशखालीत जे घडले त्याने कुणाचीही मान शरमेने खाली जाईल, पण TMC सरकारला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 14:09 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता सरकारवर केली सडकून टीका

Pm Modi on Sandeshkhali West Bengal Case: संदेशखाली येथील महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालच्याममता बॅनर्जी सरकारला सुनावले. बारासातच्या सभेत राज्यातील टीएमसी सरकारवर निशाणा साधत पीएम मोदी म्हणाले, याच भूमीवर टीएमसीचे शासन असलेल्या राज्यात माता-भगिनींवर अत्याचार झाले आहेत. संदेशखालीत जे काही घडले, ते पाहून कुणाचीही मान शरमेने खाली झुकेल. पण इथल्या सरकारला काहीही फरक पडत नाही. बंगाल सरकार आरोपींना वाचवण्यासाठी सर्वप्रकारच्या बळाचा वापर करताना दिसत आहे, असे टीकास्त्रही मोदींनी सोडले.

"ममता बॅनर्जींच्या राजवटीत घोर पाप झाले आहे. टीएमसीचे नेते ठिकठिकाणी महिलांवर आणि लहान मुलींवर अत्याचार करत आहेत. अशी प्रकरणे घडत असताना, तृणमूल काँग्रेसचा त्यांच्या नेत्यांवर विश्वास आहे, पण माता-भगिनींवर विश्वास नाही. त्यामुळेच येथील माता-भगिनींमध्ये प्रचंड रोष आहे. टीएमसीची माफिया राजवट उद्ध्वस्त करण्यासाठी राज्यातील माता-भगिनी आता पुढे सरसावल्या आहेत. टीएमसी सरकार कधीही महिलांना सुरक्षा देऊ शकत नाही अशी भावना आता त्यांच्यातही जागृत झाली आहे. त्यामुळे त्यांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी माता-भगिनीच त्यांना धडा शिकवतील," अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी ममता सरकारला इशारा दिला.

"टीएमसी सरकार बंगालमधील महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना संरक्षण देत आहे. TMC आपल्या अत्याचारी नेत्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपने बलात्काराच्या आरोपींना फाशीच्या शिक्षेची तरतूदही केली आहे. भाजप सरकारने महिला हेल्पलाइन तयार केली आहे. पण तृणमूल सरकार बंगालमध्ये त्याची अंमलबजावणी करू देत नाही. टीएमसी सरकार महिलांचे कधीही भले करू शकत नाही. पण आता टीएमसीची माफिया राजवट संपवण्यासाठी महिला शक्ती एकवटली आहे आणि ती नक्कीच यांचा सत्ता उलथवून टाकेल," असेही मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालTrinamool Congressतृणमूल काँग्रेस