PM Modi Security Breach: पंजाबच्या फिरोजपुरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या ढिसाळपणाबद्दल केंद्र सरकार आता 'अॅक्शन मोड'मध्ये आलं आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेत कोणतीही हयगय अजिबात सहन केली जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत झालेल्या चुकीबाबत सविस्तर अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयानं (Home Ministry) पंजाब सरकारकडे (Punjab Government) मागितला आहे. दरम्यान हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे. तर दुसरीकडे पंजाबच्या चन्नी सरकारनं या प्रकरणाचा तपास करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाबमधील सुरक्षेतील त्रुटीची बाब सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांच्या खंडपीठासमोर मांडण्यात आली आहे. या प्रकरणावर शुक्रवारी (७ जानेवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या याचिकेत पंजाब सरकारला योग्य निर्देश देऊन जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय पुन्हा अशा भविष्यात अशा प्रकारच्या घटना रोखण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.
PM Modi Security Breach : पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या मुद्दा पोहोचला सर्वोच्च न्यायालयात; पंजाब सरकारकडूनही समिती स्थापन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 13:14 IST