Dhirendra Shastri Marriage News: पंतप्रधान नरेद्र मोदी आज (रविवार) मध्यप्रदेश दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी बालाजी मंदिरात पूजा केली. यानंतर, त्यांनी व्यासपीठावरून बटन दाबून 'बागेश्वर धाम कर्करोग वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेचे भूमिपूजन केले. यानंतर त्यांनी उपस्थितांनाही संबोधित केले. यावेळी मोदींनी पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या आईसोबत झालेल्या भेटीसंदर्भातही भाष्य केले.
मोदी म्हणाले, आज मी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याकडे त्यांच्या मातोश्रींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. भेट झाली. पुढे विनोदी स्वरात पंतप्रधान म्हणाले, "मी धीरेंद्र शास्त्री यांच्या आईला म्हणालो, आपल्या नावाची 'चिठ्ठी' माझ्याकडे आहे. मला माहित आहे, तुमच्या मनात काय सुरू आहे. तुम्हाला तुमच्या मुलाचे लग्न करायचे आहे."
खरे तर, धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनीही, आपल्या आईला आपल्या लग्नाची काळजी वाटते, असे अनेक वेळा म्हटले आहे. ते म्हणाले होते की, त्यांची आई गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्या लग्नासंदर्भात चिंतित आहे. तसेच सोशल मीडियावरही धिरेंद्र शास्त्री यांच्या लग्नासंदर्भात चर्चा होत असतात.
आपल्या संबोधनात विरोधकांवर हल्ला चढवताना मोदी म्हणाले, "बंधूंनो, आजकाल काही नेत्यांचा एक गट तयार झाला आहे, जे धर्माची खिल्ली उडवतात. हिंदूंच्या श्रद्धांचा द्वेष करतात. आपल्या श्रद्धा, संस्कृती आणि मंदिरांवर हल्ला करतात आणि आपल्या सणांबद्दल आणि परंपरांबद्दल अपशब्द बोलत असतात."
छोटा भाऊ म्हणत धीरेंद्र शास्त्रींचा उल्लेख -पंतप्रधान पुढे म्हणाले, "माझे छोटे बंधू धीरेंद्र शास्त्री लोकांना जागरूक करत असतात. एकतेचा मंत्र देत असतात. आता त्यांनी हे कर्करोग रुग्णालय उभारण्याची जबाबदारीही घेतली आहे. अर्थत आता बागेश्वर धाममध्ये भजन, भोजन आणि निरोगी जीवनाचा आशीर्वादही मिळेल. या कामासाठी मी धीरेंद्र शास्त्री यांचे अभिनंदन करतो."
'हे श्रद्धेचे केंद्र आता आरोग्याचे केंद्र बनणार' -मोदी म्हणाले, "मला फार कमी कालावधीतच दुसऱ्यांदा वीरांची भूमी असलेल्या बुंदेलखंडात येणयाचे भाग्य लाभले. यावेळी थेट बालाजींकडूनच बोलावणे आले आहे. हनुमानजींच्या आशीर्वादाने, हे श्रद्धेचे केंद्र आता आरोग्याचे केंद्र बनणार आहे. मी येथील बागेश्वर धाम कर्करोग वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेचे भूमिपूजन केले. ही संस्था १० एकर एवढ्या परिसरात असेल. पहिल्या टप्प्यातच येथे १०० खाटांची सुविधा मिळेल. याबद्दल मी बुंदेलखंडच्या जनतेचे अभिनंदन करतो.