शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वाराणसीत पंतप्रधान मोदींचं शक्तिप्रदर्शन, उमेदवारी अर्ज भरण्याआधी करणार रोड शो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 08:37 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014च्या लोकसभा निवडणुकीत या घोषणेचा वापर केला होता.

नवी दिल्लीः मै यहां आया नही हूं, मुझे मां गंगाने बुलाया है, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014च्या लोकसभा निवडणुकीत या घोषणेचा वापर केला होता. पंतप्रधान मोदींना माते गंगेनं पुन्हा एकदा बोलावलं आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याआधी मोदी रोड शोदेखील करतील. भाजपानं पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी मेगा रोड शोचं आयोजन केलं आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विरोधकांना मोदी लाट आजही कायम आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी औपचारिकरीत्या 26 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीतल्या बाबतपूर विमानतळावर उतरणार आहे. विमानतळावरून मोदी थेट बनारस हिंदू विश्वविद्यालयात जाणार आहेत. तिथे पंडित मदन मोहन मालवीय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करणार आहेत. त्यानंतर मोदींचा रोड शो सुरू होणार आहे. 

एनडीएतले दिग्गज नेते होणार सहभागीपीएम मोदींच्या मेगा रोड शोमध्ये भाजपाचे दिग्गज नेते सहभागी होणार आहेत. हा रोड शो बीएचयूपासून दशाश्वमेध घाटापर्यंत होणार आहे. गेल्या निवडणुकीतही मोदींनी याच ठिकाणावरून रोड शो केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी गंगा आरतीमध्ये सहभागी होणार आहेत. मोदींच्या रोड शोमध्ये भाजपाध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, निर्मला सीतारामण, सुषमा स्वराज, पीयूष गोयल, योगी आदित्यनाथ यांच्यासारखे दिग्गज नेते सहभागी होणार आहेत.

शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख प्रकाश सिंह बादल, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष रामविलास पासवानही या रोड शोला उपस्थित राहणार आहेत. या रोड शोसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरिकेट्स लावण्यात आले असून, रोड शोदरम्यान मोदींवर गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जाणार आहे. हा रोड शो सात किलोमीटरनंतर काशी विश्वनाथ मंदिराच्या द्वाराजवळ संपेल. रोड शोनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दशाश्वमेद घाटावर गंगा आरतीत सहभागी होणार आहेत. गंगा आरतीनंतर मोदी काशी विश्वनाथाचे दर्शन करणार आहेत.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकvaranasi-pcवाराणसी