शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

Ram Mandir Bhoomi Pujan: जय श्रीराम! पंतप्रधान मोदींच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचा शिलान्यास संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2020 13:30 IST

Ram Mandir Bhoomi Pujan: मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न

अयोध्या: राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन झालं. यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. या सोहळ्याला १७५ जण हजर होते. देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सोहळ्यासाठी अतिशय मोजक्या व्यक्तींना निमंत्रित करण्यात आलं आहे.

अयोध्येत पंतप्रधान मोदींनी राम मंदिरासाठी भूमिपूजन केलं. त्यांनी एकूण ९ शिळांचं पूजन केलं. यावेळी कूर्म शिळा मध्यभागी ठेवण्यात आली होती. याच शिळेवर रामलला विराजमान होणार आहेत. जय श्रीराम आणि हर-हर महादेवच्या जयघोषात शिलान्यासाचा कार्यक्रम संपन्न झाला. १२ वाजून ४४ मिनिटांनी भूमिपूजन सोहळा पार पडला.पंतप्रधान मोदींच्या हस्ते ९ शिळांचं पूजन करण्यात आलं. या शिळांचं महत्त्व पुजाऱ्यांनी सांगितलं. '१९८९ मध्ये जगभरातल्या भाविकांनी मंदिरासाठी विटा पाठवल्या होत्या. अशा २ लाख ७५ हजार विटा अयोध्येत आहेत. त्यातल्या १०० विटांवर जय श्रीराम लिहिण्यात आलं आहे. त्यातल्याच ९ विटा आज इथे आणण्यात आल्या आहेत,' अशी माहिती पुजाऱ्यांनी भूमिपूजन सुरू असताना दिली.नरेंद्र मोदी तब्बल २८ वर्षांनी अयोध्येत आले आहेत. याआधी ते राम जन्मभूमी आंदोलनावेळी अयोध्येत आले होते. त्यानंतर जवळपास तीन दशकांनी मोदी अयोध्येत आले. श्रीराम जन्मभूमीचं दर्शन घेणारे ते देशाचे पहिले पंतप्रधान आहेत. याआधी देशाच्या कोणत्याही पंतप्रधानानं अयोध्येतल्या हनुमानगढीचं दर्शन घेतलं नव्हतं. त्यामुळे हनुमानगढीला भेट देणारे पहिले पंतप्रधान ठरण्याचा मान मोदींना मिळाला आहे. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरNarendra Modiनरेंद्र मोदीMohan Bhagwatमोहन भागवतyogi adityanathयोगी आदित्यनाथ