शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

पीएम नरेंद्र मोदी थेट पोखरणच्या फायरिंग रेंजवर; तोफा, रणगाड्यांनी गर्जला परिसर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 16:41 IST

पंतप्रधान मोदी मंगळवारी तिन्ही सैन्यांचा संयुक्त 'भारत शक्ती' सराव पाहण्यासाठी राजस्थानच्या पोखरणमध्ये पोहोचले.

PM Modi Modi at Pokhran: पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) मंगळवारी(दि.12) तिन्ही सैन्यांचा संयुक्त 'भारत शक्ती' सराव पाहण्यासाठी राजस्थानच्या पोखरण (pokharan) फायरिंग रेंजवर पोहोचले. यावेळी तिन्ही सैन्यांने (indian army) स्वदेशी बनावटीच्या संरक्षण उपकरणांची ताकद दाखवली. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज आपण आपल्या तिन्ही सैन्यांचे शौर्य पाहिले. ही नवीन भारताची हाक आहे.'

ही खरी भारताची शक्ती मोदी पुढे म्हणतात, 'आज आपण आपल्या तिन्ही सैन्यांचे शौर्य पाहिले. ही नव्या भारताची, हाक चौफेर गुंजत आहे. पोखरण, जे भारताच्या अणुशक्तीचे साक्षीदार आहे, आज इथेच आपण स्वदेशीच्या माध्यमातून आपली ताकद जगाला दाखवत आहोत. आज सर्वजण आपल्या तोफा, रणगाडे, लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, क्षेपणास्त्र प्रणालीची गर्जना ऐकत आहेत. शस्त्रास्त्रे, दारुगोळा, दळणवळणाची साधने, सायबर आणि अंतराळापर्यंत...आपण मेड इन इंडियाच्या उड्डाणाचा अनुभव घेत आहोत. ही खरी भारताची शक्ती आहे.'

10 वर्षात देशाच्या संरक्षण क्षेत्रात कोणते बदल झाले?पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, 'गेल्या 10 वर्षांत देशाला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर करण्यासाठी सरकारने एकापाठोपाठ एक मोठी पावले उचलली आहेत. आम्ही धोरणाशी संबंधित अनेक सुधारणा केल्या, खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढवला, एमएसएमई स्टार्टअपला प्रोत्साहन दिले. गेल्या 10 वर्षांत भारताने स्वतःचे लढाऊ विमान विकसित केले. भारताने स्वत:चे विमानवाहू जहाज तयार केले. C295 वाहतूक विमानेदेखील भारतात तयार केली जाताहेत. आज आधुनिक इंजिनेही भारतात तयार होताहेत.' 

स्वावलंबी भारताशिवाय विकास अशक्य 'आज देशात उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये संरक्षण कॉरिडॉर तयार केले जात आहेत. यामध्ये आतापर्यंत 7 हजार कोटींहून अधिक रुपयांची गुंतवणूक झाली आहे. आज आशियातील सर्वात मोठा हेलिकॉप्टर बनवणारा कारखाना भारतात कार्यरत झाला आहे. भारताच्या शक्तीचा उत्सव शौर्याची भूमी असलेल्या राजस्थानमध्ये पाहायला मिळतोय. मात्र याचा ध्वनी जगभरात ऐकू येत आहे. स्वावलंबी भारताशिवाय विकसित भारताची संकल्पना शक्य नाही. भारताचा विकास करायचा असेल तर इतरांवरील अवलंबित्व कमी करावे लागेल. त्यामुळे आज भारत खाद्यतेलापासून आधुनिक विमानापर्यंत प्रत्येक क्षेत्रात स्वावलंबनावर भर देत आहे,' असंही मोदी यावेळी म्हणाले.

संरक्षण निर्यातीत 8 पटीने वाढली 'येत्या काही वर्षांत जेव्हा आपण जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनू, तेव्हा भारताची लष्करी क्षमताही नवीन उंची गाठेल. भारताला तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनवण्यात राजस्थान मोठी भूमिका बजावेल. विकसित राजस्थान विकसित सैन्यालाही तितकेच सामर्थ्य देईल. भविष्यात भारतीय लष्कर आणि भारताचे संरक्षण क्षेत्र मोठे होणार आहे. तरुणांसाठी यात अनेक रोजगारा आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. भारत एकेकाळी जगातील सर्वात मोठा संरक्षण आयातदार देश होता. आज भारत संरक्षण क्षेत्रात मोठा निर्यातदार बनत आहे. 2014 च्या तुलनेत आज भारताच्या संरक्षण निर्यातीत 8 पटीने वाढ झाली आहे,' अशी माहितीही मोदींनी यावेळी दिली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajasthanराजस्थानindian air forceभारतीय हवाई दलIndian Armyभारतीय जवान