शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

PM मोदींनी 'मन की बात'मध्ये केली मोठी घोषणा, 140 कोटी भारतीयांना होणार थेट फायदा! जाणून घ्या काय आहे 'MANAS'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2024 15:04 IST

पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमाची सुरुवातत पॅरिस ऑलिम्पिकपासून केली. याशिवाय पीएम मोदींनी मॅथ्स ऑलिम्पियाडमध्ये विजयी झालेल्या भारतीय खेळाडूंना फोनवरून शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (28 जुलै) 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमाच्या 112 व्या भागात संबोधित केले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील विजयानंतरचा हा दुसरा अॅपिसोड होता. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशासाठी मानस (MANAS) या विशेष मोहिमेचा उल्लेख केला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील सर्व वयोगटातील भारतीयांना त्याचा थेट फायदा होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमाची सुरुवातत पॅरिस ऑलिम्पिकपासून केली. याशिवाय पीएम मोदींनी मॅथ्स ऑलिम्पियाडमध्ये विजयी झालेल्या भारतीय खेळाडूंना फोनवरून शुभेच्छा दिल्या. त्यांनी पुन्हा एकदा लोकांना तिरंगी ध्वजासोबत सेल्फी घेतलेल्या अभियानाचीही आठवण करून दिली. याच बरोबर, पंतप्रधान मोदी यांनी ड्रग्स विरोधातील लढाईसाठी 'मानस' नावाच्या एका विशेष केंद्राचाही उल्लेख केला.

काय आहे 'मानस' -पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनी अंमली पदार्थांविरोधातील लढाईत एक मोठे पाऊल उचलले आहे. रविवारी, 'मन की बात' कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आपला मुलगा अंमली पदार्थांच्या आहारी जाऊ नये, असे प्रत्येक कुटुंबाला वाटत असते. आता अशा लोकांना मदत करण्यासाठी सरकारने 'मानस' नावाचे एक खास केंद्र सुरू केले आहे. अंमली पदार्थांविरुद्धच्या लढाईतील हे एक मोठे पाऊल आहे. मानस हेल्पलाइन आणि पोर्टल काही दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आले आहे.

कुणाला मिळणार सुविधा? - यासाठी सरकारने 1933 हा एक टोल फ्री क्रमांक देखील जारी केला आहे. या क्रमांकावर कॉल करून कोणतीही व्यक्ती आवश्यक तो सल्ला घेऊ शकते. तसेच, ड्रग्जशी संबंधित इतर काही माहिती असेल, तर ती या क्रमांकावर कॉल करून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला देखील देऊ शकते. येथे सर्व माहिती गोपनीय ठेवली जाते. पंतप्रधान म्हणाले, भारताला अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या सर्व सर्व जनतेला, सर्व कुटुंबांना, सर्व संस्थांना माझा आग्रह आहे की, त्यांनी MANAS Helpline चा पुरेपूर उपयोग घ्यावा.

 

टॅग्स :Man ki Baatमन की बातNarendra Modiनरेंद्र मोदीDrugsअमली पदार्थBJPभाजपा