शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

"ही आता परजीवी काँग्रेस; ज्याच्यासोबत असते त्यालाच...", पंतप्रधान मोदींची लोकसभेत तुफान फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 19:40 IST

जवळपास अर्ध्यातासांच्या भाषणानंतर, पीएम मोदींनी काँग्रेसवर एकापाठोपाठ एक हल्ले करायलासुरवात केली. यावेळी काँग्रेस आता परजीवी झाली असल्याचेही ते म्हणाले.

लोकसभेतील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  भाषण सुरू केल्यानंतर विरोधकांनी गदारोळ सुरू केला. मात्र, विरोधकांच्या गदारोळातही पंतप्रधान मोदींनी आपले भाषण सुरूच ठेवले. दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांना अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधी नेत्यांनी त्यांचे ऐकले नाही. जवळपास अर्ध्यातासाच्या भाषणानंतर, पीएम मोदींनी काँग्रेसवर एकापाठोपाठ एक हल्ले करायलासुरवात केली. यावेळी काँग्रेस आता परजीवी झाली असल्याचेही ते म्हणाले. 

ही आता परजीवी काँग्रेस... -काँग्रेसला साथ देणाऱ्या पक्षांसंदर्भात बोलताना मोदी म्हणाले, काँग्रेसच्या सहकारी पक्षांनी लोकसभा निवडणूक निकालांचे व्यवस्थित विश्लेषण केले नाही, असे वाटते. 2024 च्या निवडणुकीनंतर काँग्रेस परजीवी झाली आहे. ही आता परजीवी काँग्रेस आहे. परजीवीसंदर्भात बोलताना मोदी म्हणाले, परजीवी ज्याच्यासोबत असते, त्यालाच खाऊन टाकते.   

काँग्रेसचे नेते शीर्षासन करतायत...पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आजकाल काँग्रेसचे नेते शिरशासनात व्यस्त आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालात त्यांना पराभव दिसत नाही. काँग्रेस लहान मुलांप्रमाणे वागत आहे. ज्या राज्यात त्यांनी एकट्याने निवडणूक लढवली, तेथे त्यांच्या मतांची टक्केवारी कमी झाली आहे, हे काँग्रेसने समजून घ्यायला हवे. काँग्रेसची अवस्था सध्या अशी झाली आहे, जसे एखाद्या मुलाचे मनोरंजन केले जात आहे.

नाव न घेता राहुल गांधींवर निशाणा -  राहुल गांधी यांच्या सोमवारच्या भाषणाचा समाचार घेत, नाव न घेता मोदी म्हणाले, "सहानुभूती मिळवण्याचे काम सुरू आहे. सहानुभूती मिळवण्यासाठी नाटकं सुरू आहेत. हजारो कोटी रुपयांच्या गुन्ह्यात ते जामिनावर आहेत. यांच्याविरोधात सावरकरांचा अपमान केल्याप्रकरणी खटला सुरू आहे. यांच्यावर संस्थांसंदर्भात खोटे बोलत असल्याचा आरोप आहे. राहुल यांचे नाव न घेता मोदी म्हणाले, हे डोळे मारतात. तुमच्याकडून होणार नाही, असे आता खुद्द काँग्रेसच त्यांना सांगत आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभा