शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

राज्यवर्धन राठोड यांच्या इशाऱ्यानंतर मोदींच्या चेहऱ्यावरील भाव बदलले; कार्यक्रम सोडून तडक निघाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 16:06 IST

विज्ञान भवनातील कार्यक्रम अर्धवट सोडून मोदी निघाले

नवी दिल्ली: पुलवामातील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारतीय हवाई दलानं दहशतवादी तळांवर केलेल्या एअर स्ट्राइकनंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर आज सकाळी पाकिस्ताननं भारताचं विमान पडल्याची बातमी आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी एका कार्यक्रमासाठी विज्ञान भवनात होते. यावेळी केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड तिथे पोहोचले. त्यांनी मोदींना इशारा केला. यानंतर मोदींनी लगेचच उपस्थितांना अभिवादन करत सभागृह सोडलं. यावेळी मोदींच्या चेहऱ्यावरील भाव अचानक बदलले होते. त्यांची भावमुद्रा अतिशय गंभीर दिसत होती.पंतप्रधान मोदी आज सकाळी 9 च्या सुमारास दिल्लीतील विज्ञान भवनात पोहोचले. काल मध्यरात्री भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषा ओलांडत जैश ए मोहम्मदच्या तळांवर बॉम्ब हल्ले केले. यानंतर सीमेवर वेगाने घडामोडी घडत आहेत. कालपासून पाकिस्तानने सीमारेषेवर गोळीबार सुरू केला. आज सकाळी पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांनी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रत्यन केला. यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी त्वरित एक उच्चस्तरीय बैठक बोलावली. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल पोहोचले. यावेळी मोदी कार्यक्रमात असल्याने याबद्दलची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी राठोड यांच्याकडे सोपवण्यात आली. यानंतर राठोड लगेचच विज्ञान भवनात पोहोचले. त्यांनी मोदींना सूचक इशारा केला आणि मोदींनी लगेचच कार्यक्रमस्थळ सोडलं.भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. काल मध्यरात्री भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषा ओलांडून जैशला दणका दिला. यानंतर आज पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांनी भारताच्या हवाई हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय हवाई दलाने प्रत्युत्तर देताच पाकिस्तानी विमानांनी पळ काढला. यावेळी भारताने पाकिस्तानचं एफ 16 विमान जमीनदोस्त केलं. एएनआय या वृतसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचं लढाऊ विमान जम्मू काश्मीरच्या नौशेरामध्ये घुसलं. हे विमान भारतीय हवाई दलाने पाडलं आणि प्रत्युत्तरादाखल 3 किलोमीटरपर्यंत गोळीबार केला. याआधी पाकिस्तानच्या विमानांनी भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी करत बॉम्ब टाकले होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दल