शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

'या' यादीत पंतप्रधान मोदी पहिले, तर ओवेसी दुसरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2018 12:38 IST

आपचे खासदार भगवंत मान तिसऱ्या स्थानावर

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोशल मीडियावरील लोकप्रियता आजही कायम आहे. फेसबुकनं केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आलीय. फेसबुक पेजवरील लोकप्रियतेचा विचार केल्यास लोकसभेतील सर्व खासदारांना मोदींनी मागे टाकलंय. मोदींच्या पाठोपाठ एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा क्रमांक लागतो. तर आम आदमी पार्टीचे पंजाबमधील खासदार भगवंत मान तिसऱ्या स्थानावर आहेत. हैदराबादचे खासदार असलेल्या असदुद्दीन ओवेसी यांना फेसबुकनं एक पत्र पाठवलंय. त्यामध्ये त्यांनी सर्वेक्षणाचा उल्लेख करत ओवेसी यांचं अभिनंदन केलंय. 'सरकारी विभाग, मंत्री आणि राजकीय पक्षांच्या फेसबुकवरील पेजचं आणि त्यांना मिळणाऱ्या प्रतिसादाचं आम्ही सर्वेक्षण केलं. यासाठी फेसबुक पेजवरील 1 जानेवारी 2017 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीतील पोस्ट, त्यावरील रिअॅक्शन, कमेंट्स, शेअर्स यांचा विचार करण्यात आला. तुम्हाला (असदुद्दीन ओवेसींना) हे समजल्यावर आनंद होईल की फेसबुक पेजवरील लोकप्रियतेच्या बाबतीत लोकसभेतील सर्व खासदारांमध्ये तुम्ही दुसऱ्या स्थानावर आहात,' असं फेसबुकनं ओवेसींनी लिहिलेल्या पत्रात म्हटलंय. एप्रिल महिन्यात फेसबुकनं देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर केली होती. यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पहिल्या क्रमांकावर होते. या यादीत राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे दुसऱ्या, तर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी तिसऱ्या स्थानावर होते. विशेष म्हणजे हे तिघेही भाजपाचे नेते आहेत.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीBJPभाजपा