शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

PM Gati Shakti Yojana: नरेंद्र मोदी उद्या लाँच करणार 'गती शक्ती योजना', देशाला 100 लाख कोटींची मिळणार भेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 15:59 IST

PM Gati Shakti Yojana: 100 लाख कोटी रुपयांची ही योजना उद्या लाँच करण्यात येणार आहे. या योजनेचा उपयोग देशातील रोजगाराच्या संधी सुधारण्यासाठी केला जाईल.

PM Gati Shakti Yojana: कोरोना महामारीमुळे डबघाईला आलेली देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत आहे. या अर्थव्यवस्थेला आणखी चालना देण्यासाठी, नवीन योजना सातत्याने सुरू केल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षी 15 ऑगस्ट रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून 'गती शक्ती योजने'ची घोषणा केली होती. 100 लाख कोटी रुपयांची ही योजना उद्या लाँच करण्यात येणार आहे. या योजनेचा उपयोग देशातील रोजगाराच्या संधी सुधारण्यासाठी केला जाईल.

देशाच्या मास्टर प्लॅन आणि पायाभूत सुविधांचा पाया घालण्यासाठी ही योजना महत्त्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे. 100 लाख कोटी रुपयांच्या या योजनेचा उपयोग देशातील रोजगाराच्या संधी चांगल्या करण्यासाठी करण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री गती शक्ती योजनेच्या माध्यमातून देशातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. ही योजना देशातील मास्टर प्लान आणि पायाभूत सुविधांचा पाया घालण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. या योजनेद्वारे स्थानिक उत्पादकांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवता येईल. यामुळे उद्योगांचा विकास होईल.

15 ऑगस्ट रोजी या योजनेची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, या योजनेमध्ये रेल्वे, रस्ते आणि महामार्ग, पेट्रोलियम आणि वायू, वीज, दूरसंचार, जहाजबांधणी, विमानचालन आणि औद्योगिक पार्क विभागांसह केंद्र सरकारच्या 16 विभागांचा समावेश केला जाईल. केंद्राच्या सर्व 16 विभागांच्या उच्च अधिकाऱ्यांचा नेटवर्क नियोजन गट तयार केला जाईल.

पंतप्रधान गती शक्ती योजनेची वैशिष्ट्ये...- 75 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान गती शक्ती योजनेची घोषणा केली.- गती शक्ती योजनेचे एकूण बजेट 100 लाख कोटी निश्चित करण्यात आले आहे.-  गती शक्ती योजनेच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील.- ही योजना पायाभूत सुविधांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करेल.- स्थानिक निर्मात्याला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवले जाईल.- योजनेअंतर्गत नवीन आर्थिक क्षेत्रेही विकसित केली जातील.- आधुनिक पायाभूत सुविधांसह पायाभूत सुविधांच्या बांधकामात समग्र दृष्टिकोन स्वीकारला जाईल.- या योजनेद्वारे संपूर्ण पायाभूत सुविधांचा पाया घातला जाईल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी