शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदी 6 मार्चला पश्चिम बंगाल दौऱ्यावर, संदेशखालीतील पीडित महिलांना भेटण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 18:30 IST

संदेशखालीतील महिलांनी तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहजहान शेख आणि त्यांच्या समर्थकांवर जमीन हडपण्याचा आणि लैंगिक छळाचा आरोप केला आहे.

पश्चिम बंगालमधील संदेशखालीतील पीडित महिलांचे प्रकरण सातत्याने जोर धरत आहे. या मुद्द्यावर भाजपसह राज्यातील विरोधी पक्ष ममता सरकारवर सातत्याने लक्ष्य करत आहेत. आता 6 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदीपश्चिम बंगाल दौऱ्यावर आहेत. यावेळी ते संदेशखालीतील पीडितांची भेटही घेणार आहेत. संदेशखालीतील महिलांनी तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहजहान शेख आणि त्यांच्या समर्थकांवर जमीन हडपण्याचा आणि लैंगिक छळाचा आरोप केला आहे.

संदेशखाली प्रकरण समोर आल्यापासूनच भाजप, काँग्रेस आणि डाव्यांचे अनेक नेते घटनास्थळी भेट देण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, प. बंगाल प्रशासनाने सुरुवातीला या नेत्यांना तेथे जाऊ दिले नाही. यानंतर उच्च न्यायालयाची परवानगी घेत, विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुभेंदू अधिकारी यांच्यासह काही भाजप आमदारांनी संदेशखाली येथे जाऊन स्थानिकांची भेट घेतली.

यासंदर्भात बोलताना भाजपच्या पश्चिम बंगाल युनिटचे प्रमुख सुकांत मजुमदार म्हणाले, पंतप्रधान मोदी 6 मार्च रोजी राज्यातील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बारासात येथे महिलांच्या एका  रॅलिला संबोधित करतील. यावेळी पंतप्रधान उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखाली येथील महिलांछी भेट घेणार का? असा प्रश्न केला असता मजुमदार म्हणाले, "जर संदेशखालीतील माता आणि बहिणींची पंतप्रधानांना भेटण्याची इच्छा असेल तर आम्ही निश्चितपणे याची व्यवस्था करू."

संदेशखालीतील सर्वाच्या तक्रारी ऐकल्या जातील - पोलीस महानिदेशकदुसरीकडे, पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक राजीव कुमार यांनी म्हटले आहे की, की पोलीस संदेशखालीतील प्रत्येक व्यक्तीची तक्रार ऐकून घेतील आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. कुमार बुधवारी संदेशखाली येथे गेले होते आणि पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगना जिल्ह्याच्या अशांत भागातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी रात्रभर तेथेच थांबले होते. येवेळी त्यांनी तेथे महिलांवरील अत्याचारात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासनही दिले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपा