शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

आत्मविश्वास म्हणजे बाजारात विकत मिळणारे औषध नव्हे- नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 15:54 IST

मी आज तुमच्याशी पंतप्रधान म्हणून नव्हे तर एक मित्र म्हणून बोलत आहे.

नवी दिल्ली: आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे. मात्र, तो कोणत्याही बाजारात विकत मिळत नाही, असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांना दिला. ते शुक्रवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या 'परीक्षा पर चर्चा' या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी देशभरातील विद्यार्थ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारले. यावेळी मोदींनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्यावेळी तणावमुक्त कसे राहाल, याबद्दल मार्गदर्शन केले. मी आज तुमच्याशी पंतप्रधान म्हणून नव्हे तर एक मित्र म्हणून बोलत आहे. आज तुम्ही माझी परीक्षा घेणार आहात आणि मला गुण देणार आहात. आयुष्यात स्वत:मधला विद्यार्थी कधीच मरून देऊ नका, त्यामुळे माणसाला जगण्याची ताकद मिळते, असे सांगत मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. विद्यार्थी एरवी विद्येची देवता असणाऱ्या सरस्वतीची उपासना करतात. मात्र, परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांनी हनुमानाची उपासना करावी, असे मोदींनी सांगितले. मी शाळेत असताना इतरांना विनोद सांगायचो. परंतु, त्यामुळे माझ्यातील आत्मविश्वास वाढत आहे, ही गोष्ट तेव्हा मला समजली होती. आत्मविश्वास ही जीवनात खूप महत्त्वपूर्ण गोष्ट असते. मात्र, आत्मविश्वास म्हणजे बाजारात मिळणारे औषध नव्हे जे एखादी आई परीक्षेच्या दिवशी आपल्या मुलाला देईल. स्वामी विवेकानंद नेहमी एक गोष्ट सांगायचे. ३३ कोटी देवीदेवतांची पुजा करा, त्यांचा आशीर्वाद घ्या, पण जर तुमच्यात आत्मविश्वास नसेल तर ३३ कोटी देवही तुमची मदत करु शकणार नाही, असे त्यांचे म्हणणे होते. आत्मविश्वास नसेल तर तुमची मेहनत वाया जाते, तुम्हाला परीक्षेत उत्तर येत असेल पण आत्मविश्वासाअभावी आठवणार नाही, त्यामुळे जीवनात आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. त्यामुळे आत्मविश्वास कमावण्यासाठी इतरांशी नव्हे तर स्वत:शीच स्पर्धा करा आणि मेहनत करा, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच पालकांनी मुलांवर दबाव टाकू नये, असा सल्लाही मोदींना दिला. आई-वडील दुसऱ्यांशी आमची तुलना करतात, या दबावातून आम्ही चांगली कामगिरी करु शकत नाही. अशा परिस्थितीला कसे सामोरे जायचे असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून मोदींना विचारण्यात आला. यावर मोदी म्हणतात, तुम्ही मित्र-मैत्रिणींशी स्पर्धा का करता. तुमच्यात आणि त्यांच्यात फरक आहे हे समजून घ्या. दुसऱ्याचे अनुकरण करताना तुमच्या पदरी निराशाच येते. तुमची बलस्थाने ओळखा आणि त्याच दिशेने पुढे जात राहा, असा सल्ला त्यांनी दिला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीexamपरीक्षा