शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी भारताचा भूभाग चीनला देऊन टाकला; राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 07:52 IST

राहुल गांधी म्हणाले, चीनबरोबर झालेल्या कराराची माहिती देताना राजनाथसिंह स्वत: संकोचले होते.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा काही प्रदेश चीनला देऊन टाकला, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे. भारत व चीन यांनी पूर्व लडाखमधून आपापले सैन्य मागे बोलाविण्यासंदर्भात नुकताच एक करार केला. त्यावर राहुल गांधी यांनी कोरडे ओढले. मात्र, हे सर्व आरोप केंद्राने फेटाळले आहेत.राहुल गांधी म्हणाले, चीनबरोबर झालेल्या कराराची माहिती देताना राजनाथसिंह स्वत: संकोचले होते. भारतीय फौजा आता पूर्व लडाखमध्ये फिंगर ३ याठिकाणी तैनात करण्यात येतील, असे राजनाथसिंह यांनी सांगितले. फिंगर ४ हे ठिकाण भारतीय हद्दीमध्ये येते. पूर्वी तिथे भारतीय लष्कराची चौकी होती. सरकार देपसांग प्रदेशाबद्दल पुढच्या फेरीत चर्चाभारताने आपला कोणताही भूभाग चीनला दिलेला नाही. यासंदर्भात करण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. यासंदर्भात राहुल गांधी यांनी केलेले आरोप देपसांग प्रदेशासहित अजूनही प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये लवकरच चर्चा होणार आहे.पूर्व लडाखमधील भारताची हद्द फिंगर ४ पर्यंत आहे, असे करण्यात आलेले विधान दिशाभूल करणारे आहे. भारताचा भूभाग कोणता हे देशाच्या नकाशात सुस्पष्टपणे दाखविले आहे.भारताचा ४३ हजार कि.मी.पेक्षा जास्त क्षेत्रफळाचा प्रदेश चीनने १९६२ सालापासून बळकाविला आहे, असे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.चूक काँग्रेसला उमगली : भाजपपंडित नेहरू यांनी चीनला भारताचा ३८ हजार चौरस कि.मी.चा प्रदेश देऊन टाकला. त्या हिमालयाएवढ्या चुकीची काँग्रेसला आता नक्कीच जाणीव झाली असेल, अशी कोपरखळी भाजपचे सरचिटणीस सी.टी. रवी यांनी राहुल गांधी यांना मारली. मोदींनी चीनला भारताचा भूभाग देऊन टाकला, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. त्याला भाजपने हे प्रत्युत्तर दिले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी