शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

PM Modi Gujarat: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमध्ये २१ हजार कोटींच्या विकासकामांचे उद्धाटन आणि पायाभरणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 15:53 IST

मला माझ्या ज्येष्ठांना आणि मातांना भेटण्याची संधी मिळाली. मी त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचो, असे म्हणत मोदी झाले भावूक

“जेव्हा मी येथून जात होतो, तेव्हा मला माझ्या ज्येष्ठांना आणि मातांना भेटण्याची संधी मिळाली. मी त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचो. एकविसाव्या शतकातील विकासासाठी भगिनी आणि माता यांचा विकास अत्यंत महत्त्वाचा आहे. आज लष्करापासून ते उद्योगांपर्यंत महिलांसाठी पुढाकार घेतला जात आहे. त्यांचे जीवन सोपे होते. त्यांना संधी देण्यास आमचे प्राधान्य आहे,” असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी बेडोदा येथे गुजरात गौरव अभियानात सहभागी झाले होते. त्यांनी अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.

“मला पावागडमध्ये देवीच्या भक्तांसाठी आधुनिक सुविधा देण्याची संधी मिळाली. देशवासीयांच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी मी देवीकडे प्रार्थना केली आणि स्वातंत्र्याच्या अमृत काळात सुवर्ण भारताचा संकल्प पूर्ण होवो यासाठी आशीर्वाद मागितले,” असे मोदी यावेळी म्हणाले. आज मातृवंदनेचा दिवस आहे आणि मी सकाळी माझ्या आईचेही आशीर्वाद घेतले असे त्यांनी सांगितले. “महिलांच्या जीवनचक्राच्या प्रत्येक टप्प्याला लक्षात घेऊन आम्ही अनेक नवीन योजना केल्या आहेत. महिलांचे जीवन आरामदायी करणे, त्यांच्या जीवनातील अडचणी कमी करणे, त्यांना पुढे जाण्यासाठी अधिकाधिक संधी देणे याला आमच्या सरकारचं प्राधान्य आहे. महिलांचा जलद विकास, त्यांचे सक्षमीकरण हे २१ व्या शतकातील भारताच्या जलद विकासासाठी तितकेच महत्त्वाचे आहे,” असेही त्यांनी नमूद केले.गरजा लक्षात घेऊन योजनाआज भारत महिलांच्या गरजा आणि आकांक्षा लक्षात घेऊन योजना बनवत आहे, निर्णय घेत आहे. यातील बहुतांश प्रकल्प हे आपल्या बहिणी आणि मुलींच्या आरोग्य, पोषण आणि सक्षमीकरणाशी संबंधित आहेत. आज लाखो माता-भगिनी आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी येथे आल्या आहेत. मला आनंद आहे की आज बडोदा येथून सुमारे २१ हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांच्या पायाभरणी करण्यात आली. हे प्रकल्प गुजरातच्या विकासापासून भारताच्या विकासाची बांधिलकी मजबूत करणार असल्याचेही मोदींनी स्पष्ट केले.

गेल्या काही वर्षांत गुजरातमधील शहरी गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी घरे बांधण्याचे अभूतपूर्व काम झाले आहे. आतापर्यंत मंजूर १०.५० लाख घरांपैकी सुमारे ७.५० लाख घरे शहरी गरीब कुटुंबांना देण्यात आली आहेत. आमच्या डबल इंजिन सरकारने गेल्या ८ वर्षांत महिलांना सक्षम केले आहे. भारताच्या विकासासाठी त्यांचे सक्षमीकरण आवश्यक आहे. आज लष्करापासून खाणींपर्यंत महिलांचे कल्याण डोळ्यासमोर ठेवून धोरणे आखली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरात