शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

Independence Day: जाणून घ्या काय आहे 'जल जीवन मिशन'?; मोदी सरकार खर्च करणार 3.5 लाख कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 11:01 AM

स्वच्छ भारतनंतर मोदींची मोठी घोषणा

नवी दिल्ली: स्वातंत्र्या दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं. या भाषणात मोदींनी पेयजल सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत जल जीवन मिशनची घोषणा केली. स्वच्छ भारत अभियानाप्रमाणेच जल जीवन मिशनदेखील जन चळवळ व्हावी, अशी आशा मोदींनी व्यक्त केली. पुढील पिढ्यांना पिण्याचं पाणी मिळावं यासाठी प्रत्येकानं पुढाकार घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. आज देशातील निम्म्याहून अधिक घरांमध्ये पिण्याचं स्वच्छ पाणी उपलब्ध नाही. त्यांच्या आयुष्यातील बराच वेळ स्वच्छ पाणी मिळवण्यात जातो. त्यामुळे सरकारनं प्रत्येक घरात पिण्याचं पाणी पोहोचवण्याचा संकल्प केला आहे, असं मोदी म्हणाले. येणाऱ्या दिवसांमध्ये जल जीवन मिशनला पुढे घेऊन जाऊ. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारं सोबत काम करतील. यासाठी सरकारकडून साडे तीन लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती मोदींनी दिली.  पावसाचं पाणी अडवणं, सूक्ष्म सिंचन, जल संवर्धन, जागरुकता, लहान मुलांना पाण्याचं महत्त्व पटवून देणं अशा विविध बाबींचा जल जीवन मिशनमध्ये समावेश असेल. पेयजल सुरक्षेवर भाष्य करताना मोदींनी जैन मुनी महुडींचा संदर्भ दिला. भविष्यात पाणी किराणा मालाच्या दुकानात विकलं जाईल, असं महुडींनी म्हटलं होतं. त्यांची ती भविष्यवाणी खरी ठरली. आज आपण दुकानातून पाणी खरेदी करतो, असं मोदींनी सांगितलं. जल जीवन मिशन केवळ सरकारी अभियान न राहता, ते जनआंदोलन व्हावं, अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndependence Dayस्वातंत्र्य दिनSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान