शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

मन की बात : ''एक मुलगी दहा मुलांच्या बरोबरीची, महिला देशाचा गौरव वाढवत आहेत''

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2018 13:50 IST

मुंबईतील माटुंगा रेल्वे स्टेशनाच मोदींनी 'मन की बात'मध्ये उल्लेख केला.  देशातील माटुंगा स्टेशन हे एकमेव स्टेशन आहे, जिथे महिला सर्व काम सांभाळत आहेत, असं सांगत माटुंगा स्टेशनच्या कर्मचारी महिलांचा मोदींनी गौरव केला. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (रविवारी) मन की बात कार्यक्रमातून देशवासियांसोबत संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी 'स्त्री शक्ती'चा गौरव केला आणि 'एक मुलगी दहा मुलांच्या बरोबरीची असते असं ते म्हणाले. नवीन वर्ष सुरू झाल्यानंतरची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही पहिलीच 'मन की बात' होती. ते म्हणाले, प्राचीन काळापासून सध्याच्या स्थितीपर्यंत अनेक महिलांनी देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले आहे.  भारतात आज महिला सर्वच क्षेत्रात पुढे जात आहेत आणि देशाचा गौरव वाढवत आहेत. नारी शक्ती नेहमीच देश, समाज आणि कुटुंब एकतेच्या सुत्रात बांधले आहे. देशात प्रचीन काळापासून महिलांना सन्मान दिला जात आहे.अंतराळवीर कल्पना चावलाचा उल्लेख यावेळी मोदींनी केला. मोदींनी  प्रकाश त्रिपाठी यांचे आभार मानले कारण, त्यांनी महिला शक्तीचे उदाहरण देताना लिहिलेल्या पत्रात भारतीय वंशाच्या अंतराळवीर कल्पना चावला यांचा उल्लेख केला. मोदी म्हणाले, 1 फेब्रुवारीला कल्पना चावलाची पुण्यतिथी आहे. अंतराळातील दुर्घटनेत तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ती आपल्यातून लवकर गेल्याचं दुःख आहे. कल्पना चावला भलेही आज आपल्यात नसेल. पण तिने देशाची मान उंचावली आहे. आज कल्पना अनेक मुलींची प्रेरणा बनललेली आहे, असं ते म्हणाले.  मुंबईतील माटुंगा रेल्वे स्टेशनाच मोदींनी 'मन की बात'मध्ये उल्लेख केला.  देशातील माटुंगा स्टेशन हे एकमेव स्टेशन आहे, जिथे महिला सर्व काम सांभाळत आहेत, असं सांगत माटुंगा स्टेशनच्या कर्मचारी महिलांचा मोदींनी गौरव केला. मोदी म्हणाले, भारतीय विदुषिंची परंपरा फार पुरातन राहिली आहे. वेदांच्या निर्मितीमध्ये त्यांचे योगदान मोठे होते. लोपमुद्रा आणि गार्गीचा आपण त्यासाठी नेहमीच उल्लेख करतो. आपण 'बेटी बचाओ' बद्दल बोलत असतो मात्र, वेदांमध्ये म्हटले आहे की एक मुलगी 10 मुलांच्या बरोबरीची असते.

टॅग्स :Man ki Baatमन की बातNarendra Modiनरेंद्र मोदी