शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आज मोदी अयोध्येला जाणार; पण मंदिरांपासून दूर राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 08:03 IST

मोदींच्या भूमिकेमुळे अयोध्येत अनेकांकडून आश्चर्य व्यक्त

अयोध्या: नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून पहिल्यांदाच अयोध्येचा दौरा करणार आहेत. मात्र ते हनुमानगढी मंदिर, राम मंदिराला भेट देणार नाहीत. मोदी धार्मिक स्थळांपासून दूर राहणार असल्यानं स्थानिकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. अयोध्येपासून मोदी लांब का राहत आहेत, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हनुमानगढी मंदिरात येऊन दर्शन करुन गेले. मग मोदी अयोध्येपासून दूर का राहत आहेत, अशी चर्चा जिल्ह्यात आहे. तर राम मंदिर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असल्यानं त्याचा निकाल आल्यावरच मोदी अयोध्येतल्या राम मंदिराला भेट देतील, अशीही चर्चा ऐकायला मिळत आहे. पंतप्रधान मोदींनी राम मंदिरासाठी भूमिपूजन करावं अशी इच्छा निर्वाणी आखाडा आणि राम जन्मभूमी प्रकरणातले प्रमुख पक्षकार धरमदास यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली. यासाठी मोदींना विनंती करा, असं मी आधीच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सुचवलं असल्याचंदेखील ते म्हणाले. तर मोदींनी अयोध्येला नक्की यावं अशी भावना फैजाबादमधल्या नाका हनुमानगढीच्या महंत रामदास यांनी व्यक्त केली. मोदींच्या अयोध्या भेटीमुळे सर्वसामान्यांना एक ठोस आश्वासन मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली. मोदी आज रामपूरमध्ये जनसभेला संबोधित करणार आहेत. अयोध्या-आंबेडकर जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं रामपूर वादग्रस्त राम जन्मभूमीपासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर आहे. फैजाबाद आणि आंबेडकर नगर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदी आज जनसभा घेणार आहेत. मोदींच्या आधी राहुल गांधी, प्रियंका गांधी या भागात येऊन गेले आहेत. राहुल यांनी 2017 मध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान हनुमानगढी मंदिराला भेट दिली होती. तर प्रियंका गेल्याच महिन्यात मंदिरात येऊन गेल्या. मात्र या दोन्ही नेत्यांनी वादग्रस्त स्थळापासून दूर राहणं पसंत केलं.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरRahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPriyanka Gandhiप्रियंका गांधीyogi adityanathयोगी आदित्यनाथ