शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींनी लष्करी गुपिते फोडून देशद्रोह केला; राहुल गांधींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 05:32 IST

हवाईदलासाठी राफेल लढाऊ विमाने खरेदीचा करार फ्रान्ससोबत होण्याआघीच त्याची माहिती उद्योगपती अनिल अंबानी यांना कळवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासकीय गोपनीय कायद्याचा भंग करीत देशद्रोहाचा गुन्हा केला असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी केला.

नवी दिल्ली : हवाईदलासाठी राफेल लढाऊ विमाने खरेदीचा करार फ्रान्ससोबत होण्याआघीच त्याची माहिती उद्योगपती अनिल अंबानी यांना कळवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासकीय गोपनीय कायद्याचा भंग करीत देशद्रोहाचा गुन्हा केला असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी केला. स्वत:ला चौकीदार म्हणविणाऱ्या मोदींवर या महाभयंकर गुन्ह्याबद्दल खटला चालवून त्यांना तुरुंगात पाठवायला हवे, अशी मागणीही त्यांनी केली.पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी हा आरोप केला तेव्हा, तुम्ही किंवा तुमचा पक्ष यासंदर्भात पोलिसांत औपचारिक फिर्याद करणार का, असे त्यांना विचारले गेले. त्यावर राहुल गांधी म्हणाले की, आम्ही हा विषय जनतेच्या न्यायालयात नेऊ. तेथे त्याचा नक्की फैसला होईल. आम्ही निवडून आल्यावर आमचे सरकार याचा नक्कीच कायदेशीर पाठपुरावा करेल.राहुल गांधी यांच्या या आरोपाचा संदर्भ ‘इंडियन एक्स्प्रेस’ दैनिकाने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या वृत्ताशी होता. राफेल करार होण्याच्या काही दिवस आधी अनिल अंबानी यांनी पॅरिसला जाऊन या होऊ घातलेल्या कराराच्या अनुषंगाने फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयातील अधिकाºयांशी चर्चा केल्याचे ते वृत्त होते. त्यात विमाने बनविणाºया एका कंपनीने असा करार होणार असल्याचे अंबानी यांनी कळविल्याचा ई-मेल पाठविल्याचाही उल्लेख होता.ताज्या घटनाक्रमाने राफेल घोटाळयाचा तिसरा पैलू समोर आला आहे. आधी नियमाला सोडून केलेले व्यवहार व वशिलेबाजीचा मुद्दा होता. आता त्याला गोपनीयता भंग करण्याचीही जोड मिळाली आहे, असेही गांधी म्हणाले.राफेलविषयी ‘कॅग’ने दिलेला अहवाल ‘निरर्थक’ आहे, असे म्हणून गांधी यांनी त्या अहवालाचे वर्णन ‘चौकीदाराच्या आॅडिटर जनरलचा रिपोर्ट’, असे केले.रिलायन्स म्हणतेतो करार राफेलशी संबंधित नाहीराहुल गांधी यांनी मोदी अंबानींचे दलाल म्हणून काम करीत असल्याचा आरोप करताना ज्या ई-मेलचा दाखला दिला त्याचा राफेल विमान खरेदी व्यवहाराशी काहीही संबंध नाही, असा खुलासा अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्स कंपनीने केला. एका निवेदनात कंपनीने म्हटले की, ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमानुसार भारतात लष्करी व नागरी हेलिकॉप्टरचे एकत्रितपणे उत्पादन करण्याविषयी एअरबस आणि आमची कंपनी यांच्यात जी चर्चा सुरू होती, त्यासंबंधीचा तो ई-मेल होता.हेर जे काम करतात ते मोदींनी केलेया कथित ई-मेलची प्रत पत्रकारांना दाखवत काँग्रेस अध्यक्ष म्हणाले की, यावरून पंतप्रधान मोदी जणू अनिल अंबानी यांचे दलाल म्हणून काम करीत होते, असे दिसते. त्यांनी होणाºया कराराची माहिती अंबानी यांना आधीच दिली म्हणूनच ते पॅरिसला गेले. हेर जे काम करतात ते मोदींनी केले आहे. पण ते करताना त्यांना पंतप्रधानपदाच्या शपथेचा विसर पडला. त्यांनी देशाच्या संरक्षणासंबंधीची माहिती खासगी व्यक्तीला आधीच देऊन गोपनीयतेचा भंग केला. हे कृत्य देशद्रोहाहून कमी नाही.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीRafale Dealराफेल डीलNarendra Modiनरेंद्र मोदी