शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पीएम अन्न योजना सर्वांपर्यंत पोहोचण्यात अपयशी, २७ टक्के कुटुंबांना पूर्ण लाभ; अभ्यासातील निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 07:06 IST

​​​​​​​ कोविड-१९ साथीच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर २४ एप्रिल रोजी ही योजना तिसऱ्यांदा सुरू करण्यात आली. या योजनेत तब्बल ८०० दशलक्ष लोकांना सामावून घेण्यात आले आहे.

 नवी दिल्ली : कोविड-१९ साथकाळात गरिबांना मोफत धान्य पुरवठा करणारी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना केंद्र सरकारने २०२० पासून तिसऱ्यांदा पुनरुज्जीवित केली असून ही योजना उद्दिष्टित लोकांपर्यंत पोहोचली असली तरी पात्र लाभार्थींना पूर्ण लाभ देेण्याचे उद्दिष्ट गाठण्यात ती अपयशी ठरली आहे, असे एका अभ्यासात समोर आले आहे.कोविड-१९ साथीच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर २४ एप्रिल रोजी ही योजना तिसऱ्यांदा सुरू करण्यात आली. या योजनेत तब्बल ८०० दशलक्ष लोकांना सामावून घेण्यात आले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यान्वये ज्या लोकांना स्वस्त धान्य दुकानातून अन्नधान्य मिळते, त्यांना मे आणि जून २०२१ मध्ये अतिरिक्त ५ किलो गहू आणि तांदूळ मोफत दिला जाणार आहे. त्यावर २५,३३२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ही योजना लाभार्थींपर्यंत पोहोचली असली तरी, अपेक्षित लाभ त्यांना पूर्णांशाने उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरली आहे, असे अजीम प्रेमजी विद्यापीठातील सेंटर ऑफ सस्टेनेबल एम्प्लॉयमेंटने केलेल्या सर्वेेक्षणात म्हटले आहे. विद्यापीठातील अर्थशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक अमित बसोले यांनी सांगितले की, केवळ २७ टक्के पात्र कुटुंबांना योजनेचा पूर्ण लाभ मिळाला आहे. ६८ टक्के कुटुंबांना काही प्रमाणात अतिरिक्त लाभ झाला आहे. या योजनेचा आढावा घेणारे तिसरे सर्वेक्षण बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या अर्थसाह्याने केले आहे. ८८ जिल्ह्यांत करण्यात आलेल्या या सर्वेक्षणानुसार, ९४ टक्के कुटुंबांना मासिक पातळीवर मोफत अन्नधान्य मिळाले आहे.

योजना यशस्वी झाल्याचा सरकारचा दावासरकारने मात्र ही योजना यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. एप्रिल ते नोव्हेंबर २०२० या काळात योजनेअंतर्गत ३२.२ दशलक्ष टन अन्नधान्याचा पुरवठा करण्यात आला. त्यातील ९३ टक्के म्हणजेच २९.८ दशलक्ष टन धान्य लाभार्थींना वितरित झाले, असे अन्न मंत्रालयाने म्हटले आहे. डलबर्गने केलेल्या सर्वेक्षणानुसार योजना यशस्वी झाल्याचा दावा मंत्रालयाने केला आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसfoodअन्न