शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

इराकमध्ये मृत पावलेल्या भारतीयांच्या कुटुंबीयांना सरकारकडून 10 लाखांची मदत जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 13:19 IST

38 जणांच्या मृतदेहांचे अवशेष काल भारतात आणण्यात आले.

इराकमध्ये आयसिसकडून मारल्या गेलेल्या 38 जणांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारकडून 10 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. पंतप्रधान मोदींनी याबद्दलची घोषणा केली आहे. इराकमधील मोसूल भागात आयसिस या दहशतवादी संघटनेने 39 भारतीयांची हत्या केली होती. यापैकी 38 जणांच्या मृतदेहांचे अवशेष काल (सोमवारी) भारतात आणण्यात आले. यासाठी परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग इराकला गेले होते. इराकमध्ये आयसिसच्या दहशतवाद्यांनी 2014 मध्ये 39 भारतीयांची हत्या केली होती. मारल्या गेलेल्या 39 पैकी एकाचे डीएनए जुळले नाहीत. त्यामुळे 38 जणांचे मृतदेह हवाई मार्गाने भारतात आणण्यात आले. यापैकी 27 जण पंजाबचे, तर चार जण हिमाचल प्रदेशचे रहिवासी होते. उर्वरित सात जण हे पश्चिम बंगाल आणि बिहारचे होते. इराकमध्ये मारल्या गेलेल्या 27 जणांच्या कुटुंबांना काल पंजाब सरकारने प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली. याशिवाय त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरीही दिली जाणार आहे. यानंतर आता केंद्र सरकारने मृत पावलेल्या सर्व व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर केली आहे. इराकमध्ये मृत पावलेले 39 जण अवैधरित्या भारताबाहेर गेल्याची माहिती काल परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी प्रसारमाध्यमांना दिली. ट्रॅव्हल एजंटच्या माध्यमातून होणारा अवैध प्रवास रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितपणे काम करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. मृतदेहांचे अवशेष भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारला इतका वेळ का लागला, असा यावेळी प्रश्न सिंग यांना विचारण्यात आला. याबद्दल बोलताना, अजूनही इराकमधील युद्ध पूर्णपणे संपलेले नाही, असे उत्तर त्यांनी दिले.  'इराकमध्ये युद्ध सुरु आहे. या युद्धादरम्यान त्यांच्या सैन्याला मृतदेहांचे अवशेष गाडलेल्या स्थितीत आढळून आले. त्यांचे केस मोठे होते. त्यावरुन ते पंजाबी असल्याची शक्यता निर्माण झाली. यावरुन पुढील तपास करण्यात आला आणि मृतदेहांच्या अवशेषांची ओळख पटली,' असे सिंग यांनी सांगितले.  

टॅग्स :ISISइसिसNarendra Modiनरेंद्र मोदी