शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या कर्त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना देणार पेन्शन; पंतप्रधान मोदींची योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 07:11 IST

कोरोना साथीचा फटका बसलेल्या कुटुंबीयांच्या स्थितीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी एका उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला, तसेच अशा मुलांच्या कल्याणासाठी काही उपाययोजनाही जाहीर केल्या.

नवी दिल्ली : कोरोना संसर्गामुळे कुटुंबातील कर्ता माणूस मरण पावला असेल, तर त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांना केंद्र सरकारकडून पेन्शन दिले जाईल, तसेच आरोग्य विम्यापोटी मिळणाऱ्या भरपाईत वाढ करण्यात येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. तसेच कोरोना साथीमध्ये आई-वडील गमावलेल्या मुलांना मोफत शिक्षण देण्याचा  निर्णय पंतप्रधानांनी घेतला आहे. त्यासाठी या मुलांना मदत करण्याकरिता पीएम केअर्स ही नवी योजनाही सुरू करण्यात आली आहे. कोरोना साथीचा फटका बसलेल्या कुटुंबीयांच्या स्थितीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी एका उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला, तसेच अशा मुलांच्या कल्याणासाठी काही उपाययोजनाही जाहीर केल्या. या बैठकीत मोदी म्हणाले की, या मुलांनी उज्ज्वल भविष्य घडवावे, चांगले नागरिक बनावे म्हणून केंद्र सरकार त्यांना सर्वतोपरी मदत करेल. कोरोना साथीसारख्या संकटात देशातील मुलांना मदत करणे हे सरकारचे कर्तव्यच आहे.पंतप्रधान कार्यालयाने यासंदर्भात सांगितले की, कोरोनाने मरण पावलेल्या कर्त्या व्यक्तीच्या कुटुंबाला  एम्प्लॉइज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या माध्यमातून पेन्शन मिळेल. अशा कुटुंबीयांना एम्प्लॉइज डिपॉझिटशी जोडलेल्या विमा योजनांचा लाभ दिला जाईल. त्याद्वारे मिळणारी भरपाई ६ लाखांवरून सात लाखांपर्यंत वाढविण्यात येईल. अशा विम्यातून किमान अडीच लाख रुपये भरपाई दिली जाईल. या  योजनेसाठी संबंधित कुटुंबीय १५ फेब्रुवारी २०२० च्या पूर्वलक्षी प्रभावापासून पुढील तीन वर्षांच्या लाभासाठी अर्ज करू शकतात. कोरोना साथीमध्ये ज्या मुलांचे आई-वडील किंवा अन्य पालक किंवा दत्तक मुलांचे पालक मरण पावले असतील त्या सर्वांना पंतप्रधान योजनेतून मदत करण्यात येईल. ही मुले १८ वर्षे वयाची झाल्यानंतर त्यांना केंद्र सरकारकडून दर महिन्याला पाठ्यवृत्ती (स्टायपेंड) दिली जाईल, तसेच २३ वर्षांचे झाल्यानंतर या मुलांना पंतप्रधान केअर्स योजनेतून प्रत्येकी १० लाख रुपये दिले जातील. उच्चशिक्षण घेण्यासाठी केंद्र सरकार या मुलांना मदत करेल, तसेच त्यांच्या शैक्षणिक कर्जावरील व्याज सरकार भरणार आहे. आयुषमान भारत योजनेंतर्गत या मुलांचा प्रत्येकी ५ लाख रुपयांचा वैद्यकीय विमा काढण्यात येईल.कोरोनामुळे आई-वडील गमावलेली मुले अठरा वर्षांची होईपर्यंत त्यांच्या नावावर प्रत्येकी १० लाख रुपये जमा झालेले असावेत, अशा रीतीने केंद्र सरकार फिक्स डिपॉझिट योजना राबविणार आहे. त्या पैशातून त्या मुलाला अठरा वर्षे वयानंतर दरमहा खर्चासाठी किंवा उच्चशिक्षणासाठी मदत केली जाईल.गणवेश, पाठ्यपुस्तकांचा खर्च सरकार करणारकोरोना साथीमध्ये आई-वडील गमावलेल्या व १० वर्षे वयाखालील मुलांना त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून जवळ असलेल्या केंद्रीय विद्यालयात प्रवेश दिला जाईल. जर हे मूल खाजगी शाळेत शिकत असेल, तर शिक्षण घेण्याच्या हक्कानुसार मंजूर केलेली फीची रक्कम पीएम केअर्स योजनेतून दिली जाईल. त्या मुलाचा गणवेश, पाठ्यपुस्तके, वह्या यांचा खर्च या योजनेतूनच केला जाईल. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी