शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

श्रीराम मंदिरावर हल्ल्याचा कट; फरीदाबादेतून संशयित ताब्यात, आयएसआयकडून घेतले प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 18:07 IST

गुजरात एटीएस आणि फरिदाबाद एसटीएफने संयुक्त कारवाईत दहशतवादी अब्दुल रहमानला अटक केली असून, त्याच्याकडून हातबॉम्ब जप्त केले आहेत.

Ayodhya Ram Mandir : गुजरात दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि फरीदाबाद स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) यांनी संयुक्त कारवाईत दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन एका तरुणाला अटक केली आहे. अब्दुल रहमान (19) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो उत्तर प्रदेशातील फैजाबाद (अयोध्या) येथील रहिवासी आहे. संशयिताला फरीदाबाद येथून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून दोन हातबॉम्बही जप्त करण्यात आले आहेत.

टार्गेट राम मंदिरपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला संशयित अब्दुल रहमान हा पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या संपर्कात होता आणि अयोध्येतील राम मंदिरावर हल्ला करण्याचा कट आखत होता. रेहमान अनेक कट्टरवादी गटांशी संबंधित असून, फैजाबादमध्ये मटणाचे दुकान चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, राम मंदिराच्या उभारणीनंतर आयएसआयने भारतात मोठा दहशतवादी कट रचण्याची योजना आखली होती, ज्यामध्ये अयोध्येतील राम मंदिर प्रमुख टार्गेट आहे.

राम मंदिराची रेकी अन् हल्ल्याचा कटअब्दुल रहमानने यापूर्वीही अनेकवेळा अयोध्येतील राम मंदिराची रेकी केली होती आणि तेथील सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित महत्त्वाची माहिती आयएसआयला दिली होती, असेही तपासात समोर आले आहे. राम मंदिरावर हँडग्रेनेडने हल्ला करुन मोठ्या प्रमाणावर विध्वंस घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा उद्देश होता. ही कारवाई करण्यात गुजरात एटीएसची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. एटीएसला एक संशयित दहशतवादी भारतात सक्रिय असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुजरात एटीएस आणि फरिदाबाद एसटीएफने सापळा रचून संशयिताला अटक केली.

संशयिताला कसे पकडले?अब्दुल रहमान फैजाबादहून ट्रेनने फरीदाबादला पोहोचला होता, तिथे एका हँडलरने त्याला हँडग्रेनेड दिले. ट्रेनने अयोध्येला परतायचे आणि तिथे हल्ला करायची योजना होती. मात्र त्याआधीच सुरक्षा यंत्रणांना इनपुट मिळाले आणि गुजरात एटीएस आणि फरिदाबाद एसटीएफने संयुक्त कारवाई करत रविवारी अब्दुल रहमानला पकडले. सध्या हरियाणा पोलीस आणि केंद्रीय यंत्रणा अब्दुल रहमानची कसून चौकशी करत आहेत. त्याच्याकडील मोबाईल आणि इतर जप्त केलेल्या साहित्याची तपासणी केली जात आहे. या कटात आणखी कोण सामील होते आणि स्थानिक मदतनीसही त्यात सामील होते का, याचाही तपास आता सुरक्षा यंत्रणा करत आहेत.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याTerror Attackदहशतवादी हल्ला