लखनौ : अयोध्येमध्ये लवकरात लवकर राममंदिर बांधण्याची प्रतिज्ञा उत्तर प्रदेशमधील होमगार्डचे महासंचालक जनरल सूर्यकुमार शुक्ला यांनी घेतल्याने वादंग निर्माण झाले आहेत. शुक्ला आॅगस्टमध्ये निवृत्त होणार आहेत.लखनौ विद्यापीठात आयोजिण्यात दोन दिवसीय कार्यक्रमात अयोध्येत राममंदिर बांधण्यासाठी उपस्थितांनी शपथ घेतली. त्यात शुक्लाही सहभागी झाले होते. या कार्यक्रमाची व्हिडीओ फित सोशल मिडियावर झळकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. शुक्ला यांनी अशा प्रकारच्या जाहीर समारंभात सहभागी होणे व शपथ घेणे टाळायला हवे होते, असे काँग्रेस व समाजवादी पार्टीने म्हटले आहे.
राम मंदिरासाठी अधिका-याची प्रतिज्ञा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 01:35 IST