शहरं
Join us  
Trending Stories
1
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
2
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
3
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
4
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
5
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
6
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
7
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
8
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
9
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
10
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
11
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
12
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
13
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
14
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल
15
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
16
'ती गुन्हेगार नाही...', भारत-पाक तणावावेळी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणीला केली होती अटक, हायकोर्टाने फटकारले
17
India Bangladesh Border Tensions: बांगलादेश सरकारचे सल्लागार जहांगीर यांनी वाढवलं युनूस यांचं 'टेन्शन'; भारताविरूद्ध ओकली गरळ
18
प्रेमासाठी मोलकरीण बनली चोर, ज्या घरात करायची धुणीभांडी तिथेच मारला डल्ला, त्यानंतर...  
19
गौहर खाननं लग्नासाठी धर्मांतराची अट घातली, अभिनेत्यानं संपवलं नात; कुशाल टंडनचा खुलासा

फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 07:59 IST

प्रत्येक वर्तन ज्यावर आक्षेप घेतला जातो, त्यात नैतिक अधःपतन असतोच असे नाही.

नवी दिल्ली : जुगार किंवा सट्टेबाजीशिवाय केवळ मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका निर्णयात स्पष्ट केले आहे. कर्नाटकातील एका सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या संचालक मंडळात निवडून आलेल्या हनुमंतरायप्पा वाय.सी. यांच्यावरील कारवाई रद्द करत, सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे पद त्यांना पुन्हा प्रदान करण्याचा निर्णय दिला.

न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्या.एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने नमूद केले, की गव्हर्नमेंट पोर्सिलेन फॅक्टरी एम्प्लॉइज हाउसिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या संचालक मंडळावर निवडून आलेले हनुमंतरायप्पा काही मित्रांबरोबर रस्त्याच्या कडेला पत्ते खेळताना आढळले होते.

न्यायालयाने काय म्हटले? 

प्रत्येक वर्तन ज्यावर आक्षेप घेतला जातो, त्यात नैतिक अधःपतन असतोच असे नाही. नैतिक अधःपतन म्हणजे मूलतः नीच, भ्रष्ट किंवा अश्लील वर्तन असावे लागते. पत्ते खेळणे हा भारतात अनेक गरीब वर्गातील लोकांचा मनोरंजनाचा सामान्य मार्ग आहे.

पदावरून हकालपट्टी ही कृत्याच्या तुलनेत अतिशय कठोर व अन्यायकारक 

हनुमंतरायप्पा हे जुगारी नाहीत, तसेच पत्ते खेळणे हा भारतात अनेक गरीब वर्गातील लोकांचा मनोरंजनाचा सामान्य मार्ग आहे,' हेही न्यायालयाने अधोरेखित केले. हनुमंतरायप्पा यांची कोणतीही चौकशी किंवा तपास न करता त्यांना २०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच निवडणूक रद्द करण्यात आली.

हनुमंतरायप्पा यांना सहकारी संस्थेच्या संचालक पदावरून काढून टाकण्याचा निर्णय कायम ठेवणारा कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय न्यायालयाने रद्द केला. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की हनुमंतरायप्पा यांची पदावरून हकालपट्टी ही त्यांच्या कृत्याच्या तुलनेत अतिशय कठोर आणि अन्यायकारक होती. म्हणून, हनुमंतरायप्पा यांचे अपील मान्य केले जाते. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयKarnatakकर्नाटक