शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! 6 महिन्यांच्या बाळाने गिळला प्लास्टिकचा बल्ब; डॉक्टरही झाले हैराण, झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 14:48 IST

Plastic bulb stuck in throat of six month old girl : एका 6 महिन्यांच्या बाळाने प्लास्टिकचा बल्ब गिळला. यामुळे चिमुकलीच्या जीवाला धोका निर्माण झाला.

नवी दिल्ली - लहान मुलांकडे नीट लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. कधी कधी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं मुलांसाठी घातक ठरू शकतं. अशीच एक घटना झारखंडमध्ये घडली आहे. पलामू जिल्ह्यातील हुसेनाबाद स्थित घोडबंधा गावात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 6 महिन्यांच्या बाळाने प्लास्टिकचा बल्ब गिळला. यामुळे चिमुकलीच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, घोडबंधा निवासी सतेंद्र राम यांची सहा महिन्यांची मुलगी प्रिया कुमारीने खेळत असताना तिने दोन इंच प्लास्टिकचा बल्ब चुकून गिळला. जो तिच्या गळ्यात जाऊन अडकला. 

गळ्यात प्लास्टिकचा बल्ब अडकल्यामुळे मुलीला खूप त्रास होऊ लागला. यानंतर कुटुंबीयांनी तिला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीने खेळता खेळता प्लास्टिकचा बल्ब तोंडात घातला, बल्ब तिच्या गळ्यात अडकल्यानंतर ती जोरजोरात रडू लागली. सुरुवातीला कुटुंबीय स्वत:च मुलीच्या तोंडात अडकलेला बल्ब काढण्याचा प्रयत्न करीत होते, मात्र कोणालाही ते जमलं नाही. मुलीच्या जीवाला धोका असल्याचं पाहत त्यांनी मुलीला रुग्णालयात दाखल केलं

मुलीच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांचे मानले आभार 

डॉक्टरांच्या टीमने अथक प्रयत्न करून चिमुकलीच्या गळ्यात अडकलेला दोन इंचाचा बल्ब बाहेर काढला. आता मुलीची प्रकृती स्थिर आहे. जेव्हा डॉक्टरांनी मुलीच्या गळ्यातून प्लास्टिकचा बल्ब काढला तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटलं. मुलीच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत. तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमुळेच मुलीचा जीव वाचल्याचं देखील म्हटलं आहे. घरातील लहान मुलांकडे दुर्लक्ष करणं अनेकदा महागात पडू शकतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Jharkhandझारखंड