शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

गुरुत्वाकर्षणाचा शोध आईनस्टाईननं लावला; अजब विधानामुळे पीयूष गोयल सोशल मीडियावर ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 08:57 IST

गुरुत्वाकर्षणाचा शोध आईनस्टाईननं लावला, मग न्यूटननं काय केलं?, नेटकऱ्यांचा सवाल

नवी दिल्ली: ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी ओला, उबरला जबाबदार धरल्यानं दोनच दिवसांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमन सोशल मीडियावर ट्रोल झाल्या. यानंतर आता रेल्वे मंत्री पीयूष गोयल नेटकऱ्यांच्या रडारवर आले आहेत. गुरुत्वाकर्षणाचा शोध लावताना आईनस्टाईनला गणिताची मदत झाली नव्हती, असं अजब विधान गोयल यांनी केलं. यानंतर सोशल मीडियानं गोयल यांची चांगलीच खिल्ली उडवली. गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटननं लावला होता. मात्र न्यूटनऐवजी आईनस्टाईनचं नाव घेतल्यानं सोशल मीडियानं गोयल यांना ट्रोल केलं आहे. मोदी-१ मध्ये अर्थ मंत्रालय सांभाळलेल्या आणि सध्या रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी असलेल्या गोयल यांनी काल ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेवरील प्रश्नाला उत्तर दिलं. अर्थव्यवस्थेचा सध्याचा वाढीचा वेग अतिशय कमी आहे. याच गतीनं अर्थव्यवस्था वाढत राहिल्यास ५ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट कसं गाठणार, असा प्रश्न गोयल यांना विचारण्यात आला होता.  अर्थव्यवस्थेबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना गोयल यांनी फार गणितात जाऊ नका, असं म्हणत सरकारचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. 'टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या आकडेवारीत जाऊ नका. आपल्याला ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था व्हायचंय. त्यासाठी अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग १२ टक्के असायला हवा. सध्या ती ६-७ टक्क्यानं वाढतेय, या गणितात जाऊ नका,' असं गोयल म्हणाले. यानंतर गोयल थेट आईनस्टाईन आणि गुरुत्वाकर्षणाचा संदर्भ दिला. गुरुत्वाकर्षणाचा शोध लावताना आईनस्टाईनला गणिताची मदत झाली नव्हती, असं गोयल बोलून गेले. यानंतर सोशल मीडियानं गोयल यांची जोरदार खिल्ली उडवली.  गोयलजी, गुरुत्वाकर्षणाचा शोध आयझॅक न्यूटननं लावला होता. आईनस्टाईननं सापेक्षतेचा सिद्धांत मांडला होता, असं ट्विट करत सोशल मीडियानं केंद्रीय मंत्र्यांना ट्रोल केलं. गोयल यांच्या अजब विधानानंतर अवघ्या थोड्याच वेळात ते ट्विटवर ट्रेंड झाले. याशिवाय आईनस्टाईन आणि न्यूटनदेखील ट्रेडिंगमध्ये आले. 

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयलNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन