शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिकेसाठी पैसे नव्हते, अखेर बहिणीने भावाचा मृतदेह टॅक्सीच्या छतावर बांधून केला १९५ किमी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 22:54 IST

या घटनेची दखल घेत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी घेत चौकशीचे आदेश दिले आणि अधिकाऱ्यांना दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

मानवतेला लाजवेल अशी घटना उत्तराखंडच्या पिथौरागढ जिल्ह्यातून समोर आली आहे. खासगी रुग्णवाहिका परवडत नसल्याने मृतदेह टॅक्सीच्या टपावर ठेवून नेल्याची घटना घडली आहे.  एका महिलेने आपल्या भावाचा मृतदेह टॅक्सीच्या छताला बांधला आणि १९५ किमी दूर असलेल्या पिथौरागढ जिल्ह्यातील एका गावात नेला. या घटनेची दखल घेत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी घेत चौकशीचे आदेश दिले आणि अधिकाऱ्यांना दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवानी (२२) नावाची मुलगी तिचा लहान भाऊ अभिषेक (२०) याच्यासोबत हल्दवानी येथे कामाला होती. शुक्रवारी अभिषेक कामावरून लवकर घरी आला आणि त्याने डोकेदुखीची तक्रार केली. नंतर तो रेल्वे रुळाजवळ बेशुद्धावस्थेत आढळून आला आणि त्याला उपचारासाठी सुशीला तिवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, हल्दवानी येथे नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर पोलिसांनी शनिवारी मृतदेह शिवानीच्या ताब्यात दिला.

शिवानीने आपल्या भावाचा मृतदेह घरी नेण्यासाठी शवागाराबाहेर उभ्या असलेल्या अनेक रुग्णवाहिका चालकांसोबत चर्चा केली. मात्र, रुग्णवाहिका चालकांनी १० ते १२ हजार रुपये भाडे मागितले. इतके पैसे तिच्याकडे नव्हते. तिने भाडे कमी करण्याची विनंती केली, पण कोणीही तिला मदत केली नाही. त्यामुळे भाडे भरू न शकल्याने तिने आपल्या गावातून एका टॅक्सी चालकाला बोलावले आणि आपल्या भावाचा मृतदेह टॅक्सीच्या छतावर बांधून तिला १९५ किलोमीटरचा प्रवास करावा लागला.

काय म्हणाले वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य?दरम्यान, ही घटना रुग्णालयाबाहेर घडली आहे, त्यामुळे ही घटना रुग्णालयात घडली असती तर आम्ही मदत केली असती, असे सुशीला तिवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण जोशी यांना या घटनेबाबत विचारले असता ते म्हणाले. तर खासगी रुग्णवाहिकांवर कोणी लक्ष ठेवत नाही आणि रुग्णांना नेण्यासाठी मनमानी भाडे आकारले जात असल्याचे रुग्णालयाबाहेर उभ्या असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले. 

दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश या घटनेची दखल घेत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी घेत चौकशीचे आदेश दिले आणि अधिकाऱ्यांना दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, राज्य सरकार या प्रकरणाची सखोल चौकशी करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच,सरकारी प्रवक्त्याने सांगितले की, धामी यांनी राज्याचे आरोग्य सचिव डॉ आर राजेश कुमार यांना या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडTaxकर