पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या 2 दिवसीय फ्रान्स दौर्यावर आहेत. ते सोमवारी (10 फेब्रुवारी) रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे पोहोचले. फ्रेंच अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींचे अॅलिसी पॅलेस येथे जोरदार स्वागत केले. फ्रान्स आणि भारत यांच्यातील संबंध अत्यंत घट्ट आहेत. आता भारत आणि फ्रान्स लवकरच एक मोठा संरक्षण करार करणार आहेत.
फ्रान्सला भारताच्या 'पिनाका'ची भुरळ -भारत आणि फ्रान्स सुमारे 1 लाख कोटी रुपयांच्या 3 स्कॉर्पियन पाणबुड्या आणि 26 राफेल लढाऊ विमानांच्या डीलला अंतिम रूप देणार आहेत. एवढेच नाही तर फ्रान्स देखील भारतातून लवकरच मल्टी-बॅरेल रॉकेट लाँचर सिस्टिम खरेदी करण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात, भारतातील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेतील (DRDO) स्ट्रॅटेजिक सिस्टिमचे महासंचालक उम्मलनेनी राजा बाबू यांनी म्हटले आहे की, फ्रान्स पिनाकासंदर्भात सक्रियपणे चर्चा करत आहे. या करारासंदर्भात चर्चा सुरू आहे. तत्पूर्वी, 90 कि.मी. पर्यंतची रेन्ज असलेली पिनका रॉकेट सिस्टिम 3 महिन्यांपूर्वी भारतातच फ्रेंच प्रतिनिधीमंडळाला दाखवण्यात आली होती.
भारतही सिंगल सीट राफेल खरेदी करणार - भारत-फ्रान्स यांच्यात सिंगल सीट राफेल लढाऊ विमान आणि 4 ट्विन सीटर ट्रेनरच्या सौद्यासाठी चर्चा सुरू आहे. 63 हजार कोटी रुपयांचा हा सौदा कॅबिनेट समितीच्या मंजुरीनंतर पूर्ण होईल. या डीलने इंडिन नेव्हीची शक्ती वाढेल. पंतप्रधान मोदींच्या फ्रान्स आणि अमेरिका दौऱ्यानंतर, सीसीएस राफेल कराराचा विचार करेल.
स्कॉर्पियन पाणबुड्यांची डील -भारत फ्रान्ससोबत 3 स्कॉर्पियन पाणबुड्यांसाठी डील करणार आहे. महाराष्ट्रात मझगांव डॉक (MDML) येथे 3 डिझल-इलेक्ट्रिक स्कॉर्पिन पाणबुड्यांच्या कंस्ट्रक्शनसाठी 33,500 कोटींच्या प्रोजेक्टसंदर्भात काही मंत्रालयांसोबत चर्चा केल्यानंतर, CCS कडून मंजूरी देण्यात येईल. या दोन्ही करारावर या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत स्वाक्षरी होणे अपेक्षित आहे.