शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पीआयबी ‘फॅक्ट चेक’ला अवघ्या २४ तासांत ब्रेक; सर्वोच्च न्यायालयाकडून अधिसूचना रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 07:32 IST

काय आहे प्रकरण? जाणून घ्या सविस्तर

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: ‘फेक न्यूज’ला आळा घालण्यासाठी  केंद्र सरकारने पत्रसूचना कार्यालयात ‘फॅक्ट चेक’ विभाग स्थापन करण्याच्या अधिसूचनेला २४ तासांच्या आत आज सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. केंद्र सरकारने बुधवारी ही अधिसूचना काढली होती.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेतील न्या. जे. बी. पारडीवाला व न्या. मनोज मिश्रा यांच्या पीठाने अधिसूचना रद्द करण्याचा आदेश दिला. माहिती-तंत्रज्ञान नियमांतील दुरुस्त्यांना कुणाल कामरा व एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले, पण त्यास स्थगिती देण्यास नकार दिल्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती.

अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर दुुरुस्तीचा प्रभाव

सन २०२३ साली नियम ३(१) (बी) (५) मध्ये करण्यात आलेली दुरुस्ती अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराला प्रभावित करणारी असून याचिकाकर्त्यांनी नियमांना दिलेले आव्हान घटनात्मक प्रश्न उपस्थित करते, असे न्यायालयाने म्हटले. 

काय आहे प्रकरण? 

केंद्र सरकारने पीआयबीच्या ‘फॅक्ट चेक’ विभागाला केंद्र सरकारचा ‘फॅक्ट चेक’ विभाग म्हणून अधिसूचित केले होते. केंद्र सरकारशी संबंधित संशयास्पद माहिती आढळल्यास ती तत्काळ हटवावी लागेल, अशी अधिसूचना काढली होती.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय