शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

64 वर्षीय महिलेच्या रेशन कार्डवर काजल अग्रवालचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 20:22 IST

64वर्षीय महिलेच्या रेशन कार्डवर अभिनेत्री काजल अग्रवालचा फोटो आढळून आल्यामुळे तमिळनाडू सरकारवर सोशल मीडियातून टीका होत आहे.

चेन्नई, दि. 14 - 64वर्षीय महिलेच्या रेशन कार्डवर अभिनेत्री काजल अग्रवालचा फोटो आढळून आल्यामुळे तमिळनाडू सरकारवर सोशल मीडियातून टीका होत आहे. तमिळनाडू सरकारने रेशन कार्डऐवजी स्मार्ट कार्ड सुरू केले आहेत, मात्र त्यात मोठ्या प्रमाणावर गोंधळ समोर येत आहे. नुकत्याच उघडकीस आलेल्या एका प्रकरणात, एका ज्येष्ठ महिलेच्या स्मार्ट कार्डवर अभिनेत्री काजल अग्रवालचे छायाचित्र आढळून आले आहे. सोशल मीडियावर या स्मार्ट कार्डचे छायाचित्र व्हायरल झाले आहे.

सेलम जिल्ह्यातील कमलापुरम येथे राहणाऱ्या या 64 वर्षांच्या महिलेसोबत हा प्रकार घडला असून सरोजा असे या महिलेचे नाव आहे. सरोजाच्या स्मार्ट कार्डवर तिच्याऐवजी अभिनेत्री काजल अग्रवालचे छायाचित्र आहे. हे छायाचित्र आणि सरोजा यांचा कोणताही संबंध नाही. आमच्या शेजारील एका महिलेच्या कार्डवरील छायाचित्रही तिच्यासारखे दिसत नाही. आता आम्हाला रेशन कसे मिळणार, असा प्रश्न सरोजाच्या नातेवाईकांनी पत्रकारांसमोर उपस्थित केला.

या गावातील अनेकांनी त्यांच्या स्मार्ट कार्डवर अनेक चुका असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. या चुकांचा दोष सरकारचा आहे आणि अभिनेते, झाडे इत्यादींची छायाचित्रे असलेली स्मार्ट कार्डे देण्यात येत आहेत, असे पट्टाली मक्कळ काट्चि या पक्षाचे नेते रामदोस यांनी म्हटले आहे.