शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

भाजपा नेत्याची करामत, प.बंगाल दंगलीसाठी वापरला गुजरात दंगलीचा फोटो

By admin | Updated: July 9, 2017 20:18 IST

शनिवारी भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी जंतर-मंतर मैदानावर निषेध आंदोलनाचे आयोजन केले होते

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 9 - एका फेसबूक पोस्टमुळे पश्चिम बंगालमधील 24 परगणा जिल्हयात दोन गटात जातीय दंगल उसळली होती. या पार्श्वभूमीवर शनिवारी भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी जंतर-मंतर मैदानावर निषेध आंदोलनाचे आयोजन केले होते. यावेळी कार्यकर्त्यांना आवाहन करताना त्यांनी नवा प्रताप केल्याचे समोर आले आहे. कार्यकर्त्यांना ट्विटरद्वारे आवाहन करताना 2002 मध्ये गुजरातमध्ये भडकलेल्या दंगलींच्या फोटोचा वापर केला आहे. या प्रकारामुळे नुपूर शर्मा अडचणीत येण्याची शक्यता आहेत. 2014 मध्ये नुपूर शर्मा केजरीवाल विरोधात निवडणूकित उभ्या होत्या. नुपूर शर्माच्या या प्रतापामुळे राजकीय वातावरण गरम होण्याची शक्यता आहे. नुपूर शर्मा यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये जमाव काही वाहनांची जाळपोळ करत असतानाचा आहे. त्यांच्या या पोस्टनंतर नेटीझन्सनी त्यांचा चांगलाच समाचर घेत त्यांना ट्रोल केलं आहे. यावेळी नेटिझन्सनी त्यांना हा फोटो पश्चिम बंगालमधील झालेल्या दंगलीतील नसून ते 2002 मधील गुजरात दंगलीचे असल्याची आठवण करून दिली. पश्चिम बंगालमध्ये उसळलेल्या जातीय दंगलीला कारणीभूत ठरल्याप्रकरणी सोशल मीडियावरुन बनावट छायाचित्र व्हायरल करणाऱ्या व्यक्तीला कोलकाता पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतले आहे.

आणखी वाचा -  

  ममता बॅनर्जी यांनी केंद्राला फटकारले
   दंगलग्रस्त भागात जवानांचे संचलन
 
पश्चिम बंगाल धगधगतोय....एका फेसबूक पोस्टमुळे जातीय हिंसाचार
काय आहे प्रकरण - एका 17 वर्षीय विद्यार्थ्यांने फेसबूवर धार्मिक स्थळासंबंधी पोस्ट केल्याने तणाव निर्माण झाला होता. हा विद्यार्थी बदुरिया येथील राहणार आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. राजनाथ सिंह यांनी ममता बॅनर्जीना याप्रकऱणी अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. परिस्थिती हाताबाहेर चालली असून केंद्राने सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना सुरक्षेसाठी पाठवलं आहे. नॉर्थ 24 परगणा येथील ही घटना आहे.ममता बॅनर्जी यांनी केंद्राला फटकारले -बशीरहाट व बदुरिया येथील वातावरण बिघडविण्यास आणि तिथे धार्मिक विद्वेष निर्माण करण्यास काही संघटना जबाबदार आहेत, असे सांगून, त्यांनी त्याबद्दलही नाव न घेता भाजपावर टीका केली. त्या म्हणाल्या, दोन धार्मिक संघटनांवर राज्य सरकारने बंदी घातली आहे. बशीरहाट व बदुरिया येथील दंगलींची न्यायालयीन चौकशी केली जाईल. राज्यातील कायदा व सुव्यवस्था नीट राखण्यात केंद्र सरकार आम्हाला मदत करीत नाही, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाजपा नेत्याची मागणी - राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती गंभीर झाली असून, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजपाच्या राज्य शाखेने केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष म्हणाले की, आम्ही राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांची भेट घेतली आणि राज्यातील गंभीर स्थितीसाठी राज्य सरकार जबाबदार असल्याचे सांगितले.दंगलग्रस्त भागातील लोकांना भरपाई देण्याची मागणीही भाजपाने केली आहे. केंद्र सरकार राज्य सरकारला मदत करत नाही, हा ममता बॅनर्जी यांचा आरोपही घोष यांनी फेटाळून लावला.