शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

Pharma Company License: केंद्र सरकारची 18 फार्मा कंपन्यांवर कारवाई; थेट कंपनीचे परवाने रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 19:55 IST

Pharma Company License Cancel: बनावट आणि निकृष्ट दर्जाची औषधे बनवणाऱ्या फार्मा कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

Pharma Company License Cancel: बनावट आणि निकृष्ट दर्जाची औषधे बनवणाऱ्या फार्मा कंपन्यांना मोठा दणका बसला आहे. भारत सरकारने मंगळवारी (28 मार्च) बनावट आणि निकृष्ट औषधांच्या निर्मितीसाठी 18 फार्मा कंपन्यांचे परवाने रद्द केले. तसेच, या कंपन्यांना उत्पादन थांबवण्यास सांगण्यात आले आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने अनेक औषध कंपन्यांची तपासणी केली होती.

केंद्र आणि राज्याच्या पथकांनी 20 राज्यांमध्ये अचानक तपासणी केली आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. अधिकृत सूत्रांनी मंगळवारी ही माहिती दिली. बनावट औषधांच्या निर्मितीशी संबंधित देशभरातील फार्मा कंपन्यांवर कठोर कारवाई सुरू आहे. सुमारे पंधरा दिवसांपासून ही मोहीम सुरू आहे.

या राज्यांमध्ये कारवाई केलीयादरम्यान हिमाचल प्रदेशातील 70, उत्तराखंडमधील 45 आणि मध्य प्रदेशातील 23 कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे. अनेक देशांतून भारतीय औषधांमुळे होणारे मृत्यू आणि आजारांच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर हे छापे टाकण्यात आले. गेल्या महिन्यात गुजरातस्थित फार्मा कंपनी Zydus Lifesciences ने अमेरिकन बाजारातून गाउटवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या जेनेरिक औषधाच्या 55,000 हून अधिक बाटल्या परत मागवल्या होत्या. औषध तपासणीत फेल ठरले.

भारतीय कंपन्यांविरोधात तक्रारी गेल्या वर्षी उझबेकिस्तानमध्ये कफ सिरपमुळे कथित 18 मुलांचा मृत्यू झाल्यानंतर नोएडा येथील एका फार्मास्युटिकल फर्मच्या तीन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर भेसळयुक्त औषधे बनवून विकल्याचा आरोप होता. फेब्रुवारी महिन्यात चेन्नईतील एका औषध कंपनीने डोळ्याच्या ट्रॉपची खेप परत मागवली होती. यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने संभाव्य संसर्गामुळे अझ्रिकेअर आय ड्रॉप्स खरेदी किंवा वापरू नका असा इशारा दिला होता.

टॅग्स :medicinesऔषधंDrugsअमली पदार्थCentral Governmentकेंद्र सरकार