शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुक, इन्स्टाग्रामच्या फोटोंवर आयकर विभागाची नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 10:07 IST

फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवरील तुमच्या फोटोंवर आता तुमच्या मित्रमंडळींसोबतच आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचीही करडी नजर असणार आहे.

ठळक मुद्देर तुम्ही तुमचा नवा अलीशान बंगला, नवी गाडी, पर्यटन स्थळाचं मोठं कॉटेज याचे फोटो फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असाल, तर तुम्हाला आता सावध रहायला हवं.फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवरील तुमच्या फोटोंवर आता तुमच्या मित्रमंडळींसोबतच आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचीही करडी नजर असणार आहे. बँक आणि पॅन कार्ड आधार कार्डशी जोडल्यानंतर आता आयकर विभागाचे अधिकारी सोशल मीडियावर करडी नजर ठेवणार आहे

मुंबई, दि. 31- एखाद्या ठिकाणी फिरायला गेल्यावर किंवा एखादी नवी वस्तू खरेदी केल्यावर त्याचे फोटो काढून ते सोशल मीडियावर पोस्ट करणं हा आजचा नवा नियम आहे. दररोज घडणाऱ्या गोष्टी स्टेटस किंवा फोटोच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर केल्या जातात. जर तुम्ही तुमचा नवा अलीशान बंगला, नवी गाडी, पर्यटन स्थळाचं मोठं कॉटेज याचे फोटो फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असाल, तर तुम्हाला आता सावध रहायला हवं. पण आता सोशल मीडियावर फोटो शेअर करायची हीच क्रेझ तुम्हाला अडचणीतही आणू शकते.  फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवरील तुमच्या फोटोंवर आता तुमच्या मित्रमंडळींसोबतच आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचीही करडी नजर असणार आहे.

बँक आणि पॅन कार्ड आधार कार्डशी जोडल्यानंतर आता आयकर विभागाचे अधिकारी सोशल मीडियावर करडी नजर ठेवणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासूनच आयकर विभागाकडून सोशल मीडियावर नजर ठेवण्याचं काम सुरू होणार असल्याची माहिती मिळते आहे. बँकेतील व्यवहारांसोबतच सोशल मीडियावर अपलोड होणाऱ्या फोटोंवर इन्कम टॅक्सची करडी नजर असेल. आयकर विभागाने सात वर्षात तब्बल एक हजार कोटी रुपये खर्च करुन ‘प्रॉजेक्ट इन्साइट’ राबवला आहे. तसंच जगातील सर्वात मोठा बायोमेट्रीक डाटाबेस तयार करण्यात आला आहे. या नव्या प्रणालीच्या विकासासाठी एल अँड टी इन्फोटेक लिमिटेडची मदत घेण्यात आली आहे.

‘प्रॉजेक्ट इन्साइट’वर अर्थमंत्रालयातून कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. एल अँड टी इन्फोटेक लिमिटेडसह गेल्या वर्षी करार झाल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं होतं.  

आयकर विभागाकडून फेसबुक तसंच इन्स्टाग्रावर युजर्सने घेतलेले नवे दागिने, नवीन कार, घर किंवा परदेश दौऱ्यांच्या फोटोंवर एका टीमच्या सहाय्याने नजर ठेवली जाणार आहे. जर त्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न आणि खर्च याचा योग्य ताळमेळ बसला नाही तर त्यांची चौकशी केली जाईल. 

या नव्या नियमामुळे सर्वसामान्य व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन होणार नाही. प्रत्येकाच्या मागे चौकशीचा तगादा लागणार नाही, असं आयकर विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं. सोशल मीडियावर करडी नजर ठेवली तर घरात छापा न टाकताच आम्हाला महत्त्वाची माहिती मिळू शकेल, असंही मत अधिकाऱ्यांने व्यक्त केलं आहे. क्रेडिट कार्डने होणारा खर्च, जागा आणि शेअर बाजारातील गुंतवणूक, कॅश ट्रॅन्झॅक्शन आणि सेविंग्ज याची माहिती नवीन प्रणालीत अपलोड केली जाईल. हा प्रकल्प पुढील वर्षी म्हणजेच मार्च २०१८ पर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.