शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

'१२ वर्षांवरील मुलांसाठी लस तयार'; Pfizer नं केंद्र सरकारकडे मागितली 'फास्ट ट्रॅक' मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 10:44 IST

Coronavirus Vaccine : अमेरिकन दिग्गज फार्मा कंपनीनं या लसीच्या वापरासाठी सरकारकडे मागितली परवानगी. जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत पाच कोटी डोस देणार असल्याचं केलं वक्तव्य.

ठळक मुद्देअमेरिकन दिग्गज फार्मा कंपनीनं या लसीच्या वापरासाठी सरकारकडे मागितली परवानगी. जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत पाच कोटी डोस देणार असल्याचं केलं वक्तव्य.

सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजला आहे. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी लस हा प्रभावी उपचार असल्याचं अनेकांचं म्हणणंही आहे. सध्या देशात १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. परंतु कोरोनापासून लहान मुलांचंही संरक्षण व्हावं यासाठी अमेरिकन फार्मा कंपनी फायझरनं (Pfizer) लस विकसित केली आहे. आपली कोरोना प्रतिबंधात्मक लस (Covid Vaccine) भारतात सापडलेल्या कोरोनाच्या व्हेरिअंटवरही प्रभावशाली आहे, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार सूत्रांनी केंद्र सरकारला सांगितलं की फायझरची ही लस १२ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्वच व्यक्तींवर प्रभावशाली दिसली आहे. तसंच दोन ते आठ अंश सेल्सिअस तापमानात कोल्ड स्टोरेजमध्ये ही लस एका महिन्यापर्यंत साठवली जाऊ शकते, असं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, कंपनीनं लसीच्या वापरासाठी फास्ट ट्रॅक मंजुरी देण्यासाठी विनंती केली आहे. याशिवाय प्रतिकुल परिस्थितीत नुकसान भरपाईसारख्या दाव्यांतून सुरक्षेसहित महत्त्वाच्या बाबतीत नियमकानं सूट दिली तर जुलै ते ऑक्टोबर या काळात ५ कोटी डोस रोल आऊट करेल, असं कंपनीनं म्हटलं आहे. सध्या देशात Covishield, Covaxin आणि Sputnik V या लसींच्या वापरास मंजुरी मिळाली आहे. यांना कोणत्याही प्रकारची सूट सरकारनं दिली नाही जशी Pfizer कडून मागण्यात येत आहे. लस प्रभावशाली फायझरनं त्यांच्या कोरोना लसीच्या वापरासाठी मंजुरी मागत भारतीय अधिकाऱ्यांना ही लस भारतात सापडलेल्या व्हेरिअंटबाबतही अधिक प्रभावशाली असल्याचं म्हटलं. तसंच ही लस१२ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांनाही दिली जाऊ शकतं असं कंपनीनं म्हटलं आहे. कंपनीची नुकतीच भारतीय अधिकाऱ्यांसोबत एक बैठक पार पडली. यामध्ये जागतिक आरोग्य संघटना आणि अन्य देशांमध्ये केलेल्या चाचणीद्वारेर ही लस किती प्रभावी आहे यासंदर्भातील समोर आलेली आकडेवारीही सादर करण्यात आली. "भारतात सद्यस्थिती सामान्य नाही. अशा परिस्थितीत सामान्यरित्या वापरली जामारी प्रक्रिया वापरली जाऊ नये," असं भारतासोबत चर्चेत सहभागी असलेल्या फायझरच्या एका उच्चपदस्थ सूत्रानं सांगितलं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतAmericaअमेरिका