शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

PF Interest Rate: दिवाळीपूर्वीच नोकरदारांना आनंदाची बातमी; पीएफवर मिळणार 8.5% व्याज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 17:13 IST

Modi Govt on PF Interest Rate: EPFO च्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीने याच वर्षी मार्चमध्ये 2020-21 च्या पीएफवर 8.5 टक्के व्याज देण्यास परवानगी दिली होती. 2019-20 मध्येही एवढेच व्याज देण्यात आले होते.

दिवाळीपूर्वीच देशातील 6 कोटी पीएफ खातेधारकांना मोदी सरकारने मोठे गिफ्ट दिले आहे. अर्थमंत्रालयाने आर्थिक वर्ष 2020-21 च्या भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफवर 8.5 टक्के व्याज देण्यास परवानगी दिली आहे.  (Modi Govt on PF Interest Rate)

कामगार मंत्रालयाचे सचिव सुनील वर्थवाल यांच्या हवाल्याने ईटीने बातमी दिली आहे. अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी पीएफवर 8.5 टक्के व्याज देण्यास मंजुरी दिली आहे. आता मंत्रालय लवकरच याची अधिसूचना जारी करणार आहे. EPFO व्याज खातेधारकांच्या खात्यांमध्ये वळते करण्यास सुरुवात करेल त्या आधीच ही अधिसूचना काढण्यात येणार आहे. 

सरकारच्या या पावलांमुळे EPFO कडे 300 कोटी रुपयांची रक्कम शिल्लक राहणार आहे. गेल्या वर्षी 2019-20 मध्ये 1000 कोटी रपये सरप्लस होते. EPFO च्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीने याच वर्षी मार्चमध्ये 2020-21 च्या पीएफवर 8.5 टक्के व्याज देण्यास परवानगी दिली होती. 2019-20 मध्येही एवढेच व्याज देण्यात आले होते. मार्चमध्ये जरी निर्णय झालेला असला तरी त्याला अर्थमंत्रालय परवानगी देते आणि त्यानंतर अंमलबजावणी केली जाते. 

पीएफ बॅलन्स कसा जाणून घ्याल... (how to check pf balance)जर तुम्हाला तुमचा पीएफ बॅलन्स जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबरवरून 011-22901406 या नंबर फोन करावा लागेल. मिस कॉल दिल्यावर तुम्हाला बॅलन्स समजणार आहे. यासाठी तुमचे युएएन, पॅन आणि आधार नंबर लिंक असायला हवेत. तसेच एसएमएसद्वारे देखील तुम्ही पीएफ बॅलन्स चेक करू शकता. 7738299899 यानंबरवर तुम्हाला एसएमएस करावा लागेल. ‘EPFOHO UAN ENG’ असे लिहून हा एसएमएस पाठविला की काही सेकंदांत तुम्हाला बॅलन्सचा मेसेज येईल.

टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधी