शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
8
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
9
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
10
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
11
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
12
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
13
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
14
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
15
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
16
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
17
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
18
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
19
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
20
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी

पीएफची निष्क्रिय खाती आता खुली होणार दावेदारांना मिळणार पैसा : ८.१५ कोटी खात्यांमध्ये ४० हजार कोटी रुपये पडून

By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST

नितीन अग्रवाल/ नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील(ईपीएफ) ८.१५ कोटी खाती अनेक वर्षांपासून निष्क्रिय असून त्यातील ४० हजार कोटी रुपये दावेदारांना परत करण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. ईपीएफओने या पैशाबाबत संबंधितांच्या मदतीसाठी हेल्प डेस्क तयार केले आहे. केंद्रीय श्रममंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी ऑनलाईन पोर्टलही सुरू केले.

नितीन अग्रवाल/ नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील(ईपीएफ) ८.१५ कोटी खाती अनेक वर्षांपासून निष्क्रिय असून त्यातील ४० हजार कोटी रुपये दावेदारांना परत करण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. ईपीएफओने या पैशाबाबत संबंधितांच्या मदतीसाठी हेल्प डेस्क तयार केले आहे. केंद्रीय श्रममंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी ऑनलाईन पोर्टलही सुरू केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईपीएफ खात्यांमध्ये पडून असलेल्या पैशाबाबत चिंता व्यक्त केली आहे. कर्मचार्‍यांना त्यांचा पैसा दिला जावा या त्यांच्या आदेशानुसार ईपीएफ खातेधारकांची ओळख पटवून सर्व रेकॉर्ड ऑनलाईन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
-------------------
येत्या सहा महिन्यांत देणार पैसा
सुमारे ८.१५ कोटी खात्यांमध्ये तीनपेक्षा जास्त वर्षांपासून कोणताही व्यवहार झालेला नाही. या खात्यांवर व्याज देणेही बंद करण्यात आले आहे. २७ ते ४० हजार कोटी रुपये जमा असून ते खर्‍या दावेदारांपर्यंत पोहोचविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. येत्या सहा महिन्यांत किंवा वर्षभरात या खात्यांतील पैसा देण्याबाबत तोडगा काढला जाईल, असे केंद्रीय भविष्य आयुक्त के.के. जालान यांनी सांगितले.
--------------------------
ओळख पटविण्याचे काम सुरू
खास स्थापन करण्यात आलेले हेल्पडेस्क खात्यांची ओळख पटविण्याचे काम करेल. खात्यांची ओळख आणि खातेधारकांची माहिती याची ओळख पटल्यानंतर भविष्य निर्वाह निधीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू केली जाईल. खातेधारकांना आपला पीएफ क्रमांक द्यावा लागेल. कर्मचार्‍यांना त्यांच्या भाषेत माहिती देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही जालान यांनी सांगितले.
---------------------------
२.५ कोटी खात्यांमध्ये २०० रुपयांपेक्षा कमी रक्कम
ईपीएफओकडे सुमारे ६०० अब्ज खात्यांचे संचालन असून निष्क्रिय खात्यांची माहिती दस्तऐवजातून मिळवून संगणकीकरण करण्याच्या कामाला वेग दिला जात आहे. निष्क्रिय खात्यांमधील २.५ कोटी खात्यांमध्ये २०० रुपयांपेक्षाही कमी पैसे असल्याची माहिती मिळाली आहे. ज्यांच्या घामाचा पैसा निष्क्रिय खात्यांमध्ये पडून आहे, अशा खातेधारकांची ओळख पटवून देण्याच्या कामी कामगार संघटना मदत करतील, असे भारतीय मजदूर संघाचे सचिव व्ही. राधाकृष्णन यांनी नमूद केले.