शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

आता ऑनलाइन ऑर्डर केल्यानंतर घरपोच मिळणार पेट्रोल-डिझेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 11:17 IST

लवकरच पेट्रोलियम पदार्थ ई-कॉमर्स संकेतस्थळांवर उपलब्ध होतील, असं पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे.

ठळक मुद्दे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या भावामुळे सगळीकडून चिंता व्यक्त केली जाते आहे.लवकरच पेट्रोलियम पदार्थ ई-कॉमर्स संकेतस्थळांवर उपलब्ध होतील, असं पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. पेट्रोलियम पदार्थ ई-कॉमर्स संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या मिळाल्या असल्याचंही धर्मेंद्र प्रधान म्हणाले आहेत.

नवी दिल्ली- पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या भावामुळे सगळीकडून चिंता व्यक्त केली जाते आहे. राजकीय पक्षांनी तर रस्त्यावर उतरून पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या भावावरून आंदोलन केलं आहे. आता लवकरच पेट्रोलियम पदार्थ ई-कॉमर्स संकेतस्थळांवर उपलब्ध होतील, असं पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. पेट्रोलियम पदार्थ ई-कॉमर्स संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या मिळाल्या असल्याचंही धर्मेंद्र प्रधान म्हणाले आहेत. ‘सुरुवातीला जेव्हा मी या संकल्पनेबद्दल बोललो, तेव्हा असं काही होऊ शकतं याबद्दल अनेकांना शंका होती. अनेकांनी ही संकल्पना प्रत्यक्षात येईल की नाही, याबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. पण आता ही संकल्पना सत्यात उतरणार आहे,’ असं धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं आहे. दिल्लीत झालेल्या इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये धर्मेद्र प्रधान बोलत होते.

पेट्रोलियम पदार्थ ई-कॉमर्स संकेतस्थळांवर उपलब्ध करुन देण्याची संकल्पना धर्मेंद्र प्रधान यांनी सगळ्यात आधी संसदेच्या सल्लागार समिती सदस्यांसमोर मांडली होती. २१ एप्रिल रोजी श्रीनगरमध्ये संसदेच्या सल्लागार समितीची बैठक झाली. नोटाबंदीनंतर डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी आणि पेट्रोल पंपांवरील लांब रांगा टाळण्यासाठी ही संकल्पना पेट्रोलियम मंत्रालयाकडून मांडण्यात आली होती.

‘संपूर्ण देशातील पेट्रोलियम क्षेत्राची एकूण उलाढाल ६.५ लाख कोटी रुपये इतकी आहे. देशातील हजारो पेट्रोल पंपांवर दररोज येणाऱ्या ग्राहकांची संख्या काही कोटी आहे. दररोज पेट्रोल पंपांवर येणाऱ्या ग्राहकांना माहिती आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने मोबाईल प्लॅटफॉर्मशी जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी मोबाईल क्षेत्रातील कंपन्यांचे सहकार्यदेखील अपेक्षित आहे,’ असं प्रधान यांनी म्हटलं आहे.