शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

Petrol, Diesel Price Cut: पेट्राेल, डिझेलचे दर घटणार? सरकार म्हणते वाट पाहा! पेट्रोलियम मंत्र्यांचे उत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 09:19 IST

. तेल कंपन्यांकडून इंधनाची दरकपात हाेईल, असे संकेत सरकारकडून मिळालेले नाही.

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : गेल्या काही आठवड्यांपासून कच्च्या तेलाच्या दरांमध्ये माेठी घसरण झाली आहे. भारताला रशियाकडूनही स्वस्त तेल मिळत आहे. त्यामुळे पेट्राेल आणि डिझेलच्या दरात कपात कधी हाेते, याकडे देशवासीयांचे डाेळे लागले आहेत. मात्र, त्यांचा भ्रमनिरास हाेण्याचीच शक्यता आहे. तेल कंपन्यांकडून इंधनाची दरकपात हाेईल, असे संकेत सरकारकडून मिळालेले नाही. उलट काही राज्यांनी व्हॅट कमी केल्याचे कारण देऊन सरकारने हात झटकले आहेत.

केंद्रीय पेट्राेलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी लाेकसभेत सरकारची बाजू मांडली. सिंह म्हणाले, की केंद्राने पेट्राेल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले. त्यानंतर काही राज्यांनी व्हॅटमध्ये कपात केली. मात्र, सहा राज्यांनी व्हॅट कमी केलेला नाही. म्हणूनच या राज्यांमध्ये पेट्राेल आणि डिझेल महाग आहे, असे सांगितले. पुरी यांच्या उत्तराने असंतुष्ट विराेधी पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केला.

२२ मे राेजी घटले हाेते दरपश्चिम बंगाल, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ आणि झारखंड या राज्यांनी व्हॅटमध्ये कपात केलेली नाही. केंद्राने २१ नाेव्हेंबर २०२१ आणि २२ मे २०२२ राेजी उत्पादन शुल्कात कपात केली. त्यानंतर पेट्राेल आणि डिझेलचे दर अनुक्रमे १३ आणि १६ रुपये प्रति लीटरने घटले. काही राज्यांनी व्हॅट कमी केल्यानंतर त्या ठिकाणी जनतेला दिलासा मिळाला हाेता. तेव्हापासून देशभरात पेट्राेल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.

तेल कंपन्यांना २७ हजार काेटींचा ताेटाn कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे तेल कंपन्यांना २७ हजार २७६ काेटी रुपयांचा ताेटा झालेला आहे. n अनेक देशांमध्ये इंधन महाग झाले आहे. मात्र, भारतात त्या तुलनेत तेवढी दरवाढ झालेली नाही, असे पुरी म्हणाले. n सध्या कच्च्या तेलाचे दर ७६ ते ८० डॉलर प्रतिबॅरल दरम्यान आले आहेत.

६ एप्रिलपासून दरवाढ केलेली नाहीn नाेव्हेंबर २०२० ते नाेव्हेंबर २०२२ दरम्यान कच्च्या तेलाचे सरासरी दर १०२ डाॅलर्स प्रतिबॅरल राहिले. n त्यातुलनेत पेट्राेल आणि डिझेलच्या दरात १८.९५ आणि २५.५ टक्के वाढ झाली आहे.n तेल कंपन्यांनी दरवाढ ६ एप्रिलपासून केलेली नाही.

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेल