शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल-डिझेल दरवाढीतून लोकांना दिलासा देण्याच्या मूडमध्ये नाही मोदी सरकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2018 09:45 IST

सर्वसामान्य लोकांना वाढत्या किंमतीमधून दिलासा देण्याच्या मूडमध्ये मोदी सरकार दिसत नाहीये.

नवी दिल्ली- पेट्रोल-डिझेलच्या दररोज वाढणाऱ्या किंमती सर्वसामान्यांमध्ये चिंतेचा विषय आहे. विरोधकांकडूनही मोदी सरकारवर कडाडून टीका होते आहे. पण असतानाही सर्वसामान्य लोकांना वाढत्या किंमतीमधून दिलासा देण्याच्या मूडमध्ये मोदी सरकार दिसत नाहीये. आंतरराष्ट्रीय बाजाता कच्च्या तेलाच्या किंमती खूप वाढल्या आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे सरकार चिंतीत तर आहे पण तरीसुद्धा अबकारी कर कमी करण्यासारखी पावलं उचलून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा सरकारचा कुठलाही विचार नाही. 

सरकारने कर कमी केला तर अनेक कल्याणकारी योजनांसाठी निधी जमा करण्यावर त्याचा परिणाम होईल. सध्या नियंत्रणात असलेली महागाईवर याचा परिणाम होईल. बाजाराला लक्षात घेऊन अशाप्रकारची पावलं उचलणं आता योग्य नाही. गेल्या दोन दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती दोन डॉलर प्रति बॅरलने कमी झाल्या. 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि तेथे नवीन सरकारच्या स्थापनेनंतर आता ग्राहकांना तात्काळा दिलासा देण्यासाठी काही राजकीय दबाव नाही. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये नोव्हेंबर महिन्यात निवडणुका आहेत. त्यामुळे सरकारकडे इंधनाच्या किंमती कमी करण्यासाठी योग्य वेळ आहे. 

'सध्याजी जी परिस्थिती आहे. ती सुखावणारी नाही. पण याचा सामना करावा लागेल. अनेक वेळा अर्थव्यवस्थेच्या हितासाठी आणि आर्थिक परिस्थिती पाहता असे कठोर निर्णय घ्यावे लागतात, असं मत एका भाजपाच्या वरिष्ठ नेत्याने मांडलं आहे. 2014 मध्ये भाजपाने काँग्रेस विरोधात तेलाच्या वाढत्या किंमतीचा मुद्दा उठवला होता. पण वर्तमानात भाजपा सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे विरोधकांच्या टीकेचा धनी होते आहे.